Kanpur Bus Accident : कानपूरमध्ये मद्यधुंद चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं, अनेकांना चिरडलं, सहा जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) शहरात रविवारी रात्री घंटाघर येथून टाट मिल कडे जाणाऱ्या एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने (Bus Accident) अनेक गाड्यांना चिरडले.
कानपूर : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) शहरात रविवारी रात्री घंटाघर येथून टाट मिल कडे जाणाऱ्या एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने (Bus Accident) अनेक गाड्यांना चिरडले. या बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं होतं. रात्री साडेअकरा वाजता टाट मिल जवळ बसचा अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही लोक जखमी आहेत. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. बस चालकानं मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमी व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. प्राथमिक तपासामध्ये या अपघातामध्ये ड्रायव्हरची चूक असल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज देखील शोधण्याचे काम सुरू आहे. सहा जणांपैकी तीन जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे.
प्रियांका गांधी वाड्रा यांचं ट्विट
कानपुर से सड़क हादसे का बहुत ही दुखद समाचार प्राप्त हुआ।
मृतकों के परिजनों के प्रति मेरी गहरी शोक संवेदनाएं। मैं ईश्वर से प्रार्थना करती हूं कि घायलों को जल्द स्वास्थ्य लाभ मिले।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 30, 2022
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करुन कानपूर मधून येणारी अपघाताची घटना ही दुःखद असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून प्रार्थना करत असल्याचं प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटलंय.
चालकानं मद्यप्राशन केल्याची माहिती
कानपूरमध्ये बसने चिरडल्याने मोठा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू नऊ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या परिवहन बसने रिक्षा सह अनेक वाहनांना चिरडले. बस चालकाच्या हातातून बस अनियंत्रित झाल्याने मोठा अपघात घडला. सहापैकी तीन जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. बस चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या:
Uttar Pradesh electric bus hit many vehicles in Kanpur six people died many people injured