Uttar Pradesh : समाजवादी पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप, वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवलं, अखेर आमदारावर गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप लावण्यात आला आहे. वॉर्ड प्रमुखाला आमदार महेंद्र यादव यांनी त्यांच्या घरी ओलीस ठेवल्याचा हा गंभीर आरोप आहे. गेल्या चार महिन्यांपासून वार्ड प्रमुख बेपत्ता होता. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप झाल्याने उत्तर प्रदेशात या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) समाजवादी पक्षाच्या (Samajvadi Party) आमदारावर गंभीर आरोप लावण्यात आला आहे. वॉर्ड (block) प्रमुखाला आमदार महेंद्र यादव यांनी त्यांच्या घरी ओलीस ठेवल्याचा हा गंभीर आरोप आहे. गेल्या चार महिन्यांपासून वार्ड प्रमुख बेपत्ता होता. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या आमदारावर (MLA) गंभीर आरोप झाल्याने उत्तर प्रदेशात या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे. स्थानिक पोलीस अधिकारी आशिष श्रीवास्तव यांनी दिलेल्या महितीनुसार, 18 मार्चला संध्याकाळी ओमप्रकाश यांनी कलवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी 23 ऑक्टोबरला राम कुमारला समाजवादी पक्षाचे आमदार महेंद्र नाथ यादव यांनी त्यांच्या घरी नेलं आणि तेव्हापासून ते कुटुंबियांना भेटले नसून बेपत्ता आहेत. याप्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान, राम कुमार यांना का ओलीस ठेवण्यात आले, आमदारावर वॉर्ड प्रमुखाला ओलीस ठेवण्याची वेळ का पडली, याचा तपास पोलीस करत आहे.
आमदाराच्या घरावर छापा
या संपूर्ण माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी आशिष श्रीवास्तव यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. यानुसार साजवादी पक्षाचे आमदार महेंद्रनाथ यादव यांच्या घरावर छापा टाकण्याच आला. त्यावेळी आमदाराच्या घरात बहादूरपूर वॉर्डचे प्रमुख राम कुमार दिसून आले. त्यानंतर राम कुमार यांना त्यांच्या कुटुबियांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. विशेष म्हणजे राम कुमार यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
प्रकरण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत
वॉर्ड प्रमुखाला ओलीस ठेवल्याचं प्रकरण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राम कुमार बेपत्ता झाल्यापासून अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. पोलिसांनाही हे प्रकरण लवकर सोडवायचे होते. त्यानंतर राम कुमारचा मेहुणा ओमप्रकाश यांच्याकडून पोलिसांना आवश्यक ती माहिती देण्यात आली. यानंतर या प्रकरणाला वेग आला होता. पोलिसांनी छापा टाकून राम कुमार यांची सुखरुप सुटका केली. आता पोलीस राम कुमार यांना का ओलीस ठेवण्यात आले होते, याचा तपास करत आहे.
चर्चेला उधान
समाजवादी पक्षाचे महेंद्रनाथ यादव हे नव्याने निवडणून आलेले आमदार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशतील भाजपच्या निशाण्यावर समाजवादी पक्ष येऊ शकतो. विरोधकांची टीकाही होऊ शकते. कारण, वॉर्ड प्रमुखाला का ओली ठेवलं होतं, आमदार महोदयांचे असं वागणे योग्य आहे का, यावर आता उत्तर प्रदेशात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या या प्रतापामुळे वॉर्ड प्रमुखाला पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.
इतर बातम्या