मनाला चटका लावणारी बातमी, भीषण अपघात, बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू

अल्मोडाच्या मार्चुला जवळ हा भीषण अपघात झाला. बस किनाथहून प्रवाशांना घेऊन रामनगरच्या दिशेने चाललेली. या दरम्यान बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली आहे

मनाला चटका लावणारी बातमी, भीषण अपघात, बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू
Bus Accident
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 2:13 PM

एक भीषण अपघात झाला आहे. प्रवासी बस दरीत कोसळली. यात 36 जण ठार झाले आहेत. तीन जखमींना एअरलिफ्ट करुन ऋषिकेश एम्स येथे आणण्यात आलय. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेस्क्यू अभियान पूर्ण झालं आहे. या बसमध्ये 42 प्रवासी होते. उत्तराखंडच्या अल्मोडा येथे सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.

या अपघातात बसचं पूर्णपणे नुकसान झालय. स्थानिकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी बोलवण्यात आलय. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. अल्मोडाच्या SSP सह अनेक मोठे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

अल्मोडाच्या मार्चुला जवळ हा भीषण अपघात झाला. बस नैनीडांडाच्या किनाथ येथून प्रवाशांना घेऊन चालली होती. बसला रामनगरला जायचं होतं. बस सारड बँड येथे नदीत कोसळली. डोंगराळ भागात हा अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बस दरीत कोसळल्याच व्हिडिओमध्ये दिसतय.

मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बस दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार-चार लाख आणि जखमींना 1-1 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. सीएम धामी यांनी पौडी आणि अल्मोडाच्या आरटीओ प्रवर्तनला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.