Uttarakhand Joshimath Dam: उत्तराखंडाच्या हाहाकाराचा पहिला व्हिडीओ, तुमचाही थरकाप उडेल!

उत्तराखंडच्या जोशीमठात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)

Uttarakhand Joshimath Dam: उत्तराखंडाच्या हाहाकाराचा पहिला व्हिडीओ, तुमचाही थरकाप उडेल!
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 1:16 PM

उत्तराखंड: उत्तराखंडच्या जोशीमठात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेचा पहिला व्हिडीओ आला असून त्यातून निसर्गाने उडवलेला हाहाकार दिसून येतोय. नदीच्या रौद्ररुपावरून अनेक लोक वाहून जाताना दिसत असून व्हिडीओतून स्थानिकांचा आक्रोशही ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ अत्यंत धक्कादायक असून हा व्हिडीओ पाहिल्यास तुमचाही थरकाप उडेल असाच आहे. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)

उत्तराखंडामध्ये हिमकडा कोसळल्यानंतर चमौली येथील धौली गंगा नदीला मोठा महापूर आला आहे. त्याचा 3 मिनिटे सहा सेकंदाचा व्हिडीओ आला आहे. या व्हिडीओत धौली गंगा दोन डोंगररांगामधून वाहताना दिसत आहे. मात्र, या नदीला महापूर आला असून ही नदी आक्राळविक्राळ रुप धारण केलेली दिसत आहे.

नदीने अत्यंत रौद्ररुप धारण केलं असून पाणी आपलं नेहमीचं वळण सोडून गावात जाताना दिसत आहे. जोरदार वर्षाव व्हावा तसं हे पाणी अत्यंत वेगाने गावात शिरताना दिसत आहे. पापणी लवण्याच्या आत पाण्याचा प्रवाह गावात शिरताना दिसत असून त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाण्याने घेरलेलं दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकांची पळापळ सुरू असलेलं दिसत आहे.

गावं सोडा, तरुणाचा टाहो

धौली नदीने रौद्ररुप धारण केल्यानंतरचा हा सकाळी घेतलेला व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ 11 च्या सुमारास घेतला आहे. हा व्हिडीओ काढणारा तरुण महापूर आला असून तुम्ही गावं सोडून निघून जा असं वारंवार घसा फोडून सांगत आहे. तसेच हा महापूर किती भयंकर आहे आणि त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं हे तो वारंवार सांगत आहे. हा व्हिडीओ काढणारा तरुण प्रचंड घाबरलेला दिसत आहे. त्याचा मोबाईल सारखा हलत असल्याने व्हिडीओही हालताना दिसत आहे. या व्हिडीतील तरुण कण्हत आहे. विव्हळत आहे. प्रचंड घाबरल्याने तो स्थानिक भाषेत लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)

चार जिल्ह्यांना अॅलर्ट जारी

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धावली नदीला महापूर आला असून पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर सुमारे 75 लोक वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यासह चार जिल्ह्यांना अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना गावं सोडून इतरत्र जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)

संबंधित बातम्या:

Uttarakhand Joshimath Dam News LIVE : जोशीमठात हिमकडा कोसळल्याने धरण फुटलं; 50-75 लोक वाहून गेल्याची भीती

Uttarakhand Joshimath Dam News LIVE : मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना, जारी केला हेल्पलाईन नंबर – 1070 आणि 9557444486

LIVE : नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी

(Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.