Uttarkashi Tunnel Rescue | 13 दिवस, 41 जीव, अजून किती थांबायच? ड्रिलिंग मशीन दुरुस्त झाली का?
Uttarkashi Tunnel Rescue | उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सिलक्यारा टनेलमध्ये 41 मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर ऑपरेशन सुरु आहे. वारंवार काहीना काही अडथळे येत आहे. काल सकाळी 8 वाजेपर्यंत रेसक्यु ऑपरेशन पूर्ण होणार होता. पण अजूनही ते सुरुच आहे.
Uttarkashi Tunnel Rescue Operation | उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सिलक्यारा टनेलमध्ये 41 मजूर मागच्या 13 दिवसांपासून अडकले आहेत. काल रेसक्यु ऑपरेशनचा 12 वा दिवस होता. आधी काल सकाळी 8 वाजेपर्यंत रेसक्यु ऑपरेशन पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आणखी 12 ते 14 तास लागतील असं सांगितलं गेलं. पण अजूनही हे रेसक्यु ऑपरेशन पूर्ण झालेलं नाही. अनेक अडथळे बचाव मोहिमेमध्ये येत आहेत. ऑगर ड्रिलिंग मशीन बिघडली होती. त्यामुळे ड्रिलिंगद्वारे खोदकाम थांबवण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी मशीन दुरुस्त झाली. लवकरच पुन्हा ड्रिलिंग कार्य सुरु होईल. भूस्खलनानंतर ढिगारा बोगद्याच्या तोंडावर आला. त्यामुळे टनेलचा द्वार बंद आहे. टनेलमध्ये आतापर्यंत 48 मीटरपर्यंच ड्रिलिंग करण्यात आलय. मजूरांपर्यंत पोहोचण्यासाठी 60 मीटर ड्रिलिंग कराव लागेल.
टनेल दुर्घटनेबद्दल 10 मोठे अपडेट्स जाणून घ्या
1 उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांसाठी शुक्रवारी सकाळी खाण्याचे पॅकेट्स पाठवण्यात आले. भोजनाचे पॅकेट्स पाइपच्या माध्यमातून आतमध्ये पाठवण्यात आले.
2 पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुलबे यांच्यानुसार, टनेलमध्ये फसलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते. 14 मीटर ड्रिल अजून बाकी आहे.
3 उत्तरकाशीमध्ये टनेलमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ड्रोन टेक्निकचा वापर केला जातोय.
4 टनेल दुर्घटनेबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा बचाव कार्याबद्दल धामी यांच्याकडून माहिती घेतली.
5 केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि राजमार्ग राज्य मंत्री वी.के.सिंह यानी बचावकार्याचा आढावा घेतला. ते गुरुवारी सिलक्यारामध्ये आले होते.
6 सीएम धामीने टनेलमध्ये अडकलेल्या गब्बर सिंह नेगी आणि सबा अहमदशी चर्चा केली. त्यांचं मनोबल वाढवलं.
7 टनेलमध्ये अडलेले सर्व 41 मजूर सुरक्षित आहेत. यापैकी अनेकांनी आपल्या कुटुंबीयांशी चर्चा केली.
8 छोट्या पाइपद्वारे अन्न आणि औषध टनेलमध्ये पाठवली जात आहेत. टनेलमध्ये अकडलेल्या मजुरांचे फोटो समोर आलेत.
9 बचाव कार्यात वारंवार अडथळे येत आहेत. पण या मजुरांना बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
10 एकादा का पाईप ढिगाऱ्याच्या दुसऱ्याबाजूला पोहोचला की, रेसक्यु ऑपरेशनमधील जवान आतमध्ये जाऊन एक-एक करुन मजुरांना बाहेर काढतील. जवानांनी याचा सराव केला आहे. ही दुर्घटना 12 नोव्हेंबरला घडली. निर्माणाधीन टनेल पुढचा भाग कोसळला होता.