Uttarkashi Tunnel Rescue | 12 दिवस, 41 जीव, सकाळी 8 वाजेपर्यंत मजूर बाहेर येणार होते, पण….
Uttarkashi Tunnel Rescue | सिलक्यारा टनेलमध्ये मागच्या 12 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. अजूनही या मजुरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. अपेक्षांच्यापुढे आणखी एक अडचणींचा मोठा खडक उभं आहे. मजुरांपर्यंत पोहोचायला अजून किती तास लागणार?
Uttarkashi Tunnel Rescue | उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सिलक्यारा टनेलमध्ये मागच्या 12 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. या मजुरांच्या सुटकेसाठी युद्ध पातळीवर रेसक्यु ऑपरेशन सुरु आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत बचाव पथक या मजुरांपर्यंत पोहोचेल असं म्हटलं जातं होतं. पण आता आणखी काही तास लागणार आहेत. कारण प्रत्येकवेळी या रेसक्यु मिशनमध्ये काही ना काही अडचण येतेय. रेसक्यु टीमने बुधवारी रात्री ड्रिलिंगचा मार्ग रोखणारी लोखंडाची जाळी कापली. ड्रिलिंग पूर्ण करुन मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून 12 ते 14 तास लागू शकतात. पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुलबे यांनी ही माहिती दिली. हे बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे. वेल्डिंग एक्सपर्ट्ना दिल्लीहून सिल्कयारा येथे बोलवण्यात आलय. इंटरनॅशनल टनलिंग एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स बचावकार्य सुरु असलेल्या सिल्कयारा येथे पोहोचले आहेत. यावेळी असं वाटतय की, आम्ही पुढच्या दरवाजावर आहोत. आम्ही तो दरवाजा ठोठावतोय, असं अर्नोल्ड डिक्स म्हणाले.
जिल्ंहाधिकारी अभिषेक रूहेला यांनी सांगितलं की, “बचावकार्यात काही अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी काही तज्ज्ञांना बोलवण्यात आलय. आम्ही बरच अंतर कापलय. थोड काम बाकी आहे. अजून कितीवेळ लागेल हे सांगू शकत नाही. अनेकदा नवीन समस्या येत आहेत. बचावकार्य वेगात सुरु आहे. या बचाव कार्यावर भारत सरकार आणि राज्य सरकार दोघांच लक्ष आहे. भारत सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळतय” 45 मीटरच्या पुढे आणखी 6 मीटर जाण्यासाठी पाइप वेल्डिंगची आवश्यकता आहे. ते आम्ही तयार करतोय. “रात्री 45 मीटरपर्यंत पोहोचल्यावर काही स्टीलची संरचना समोर आली. रात्रीच्या अंधारात ती स्टीलची संरचना कापण्यासाठी 6 तास लागले” असं पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितलं.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Uttarkashi DM Abhishek Ruhela says “We have covered a majority of the distance and there is little work left. Our teams are continuously trying to overcome the technical problems that we are facing. We are taking advice from… pic.twitter.com/HsriUXif0W
— ANI (@ANI) November 23, 2023
बचाव मोहिम अंतिम टप्प्यात
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी सांगितलं की, “ऑगर मशीनच्या माध्यमातून 45 मीटरची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. बचाव मोहिम अंतिम टप्प्यात आहे. काही अडथळे येत आहेत. पण आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की, लवकरात लवकर सर्व मजूर बाहेर यावेत”