बुलडोझर कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी, प्रतिज्ञापत्र सादरीकरणाच्या सूचना, पुढच्या आठवड्यात पुन्हा सुनावणी
जमियत उलेमा-ए-हिंदने ही याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला जमियत-उलामा-इ-हिंद आणि इतरांच्या याचिकांवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशातील हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याप्रकरणी (Bulldozer Action) सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. जमियत उलेमा-ए-हिंदने ही याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उत्तर प्रदेश सरकारला जमियत-उलामा-इ-हिंद आणि इतरांच्या याचिकांवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. उत्तरप्रदेश अधिकार्यांना निर्देश दिले आहेत. राज्यामध्ये योग्य प्रक्रियेचं पालन झाल्याशिवाय मालमत्ता पाडल्या जाणार नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं आहे. उत्तर प्रदेश सरकारला 3 दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं.तर पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात असेल.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना
जमियत उलेमा-ए-हिंदने ही याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला जमियत-उलामा-इ-हिंद आणि इतरांच्या याचिकांवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. उत्तरप्रदेश अधिकार्यांना निर्देश दिले आहेत. राज्यामध्ये योग्य प्रक्रियेचं पालन झाल्याशिवाय मालमत्ता पाडल्या जाणार नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं आहे. उत्तर प्रदेश सरकारला 3 दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं.तर पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात असेल.
SC asks UP govt to file response on pleas by Jamiat-Ulama-I-Hind & others seeking directions to UP authorities to ensure that no further demolitions of properties are carried out in State without following due process; asks UP govt to file affidavit in 3 days. Hearing next week pic.twitter.com/Gz1mCz5E8m
— ANI (@ANI) June 16, 2022
न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कायदेशीर रित्या कारवाई केली जात नसल्याचं म्हणत ही कारवाई थांबवण्याचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी जमियतने न्यायालयाकडे केली होताी. उत्तर प्रदेशच्या बुलडोझर कारवाईला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही जमियतने केली होती. यावर आज सुनावणी झाली. 3 दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास उत्तर प्रदेश सरकारला सांगितलं आहे.तर पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.
प्रयागराजला 10 जूनला झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेद याचं घर जमीनदोस्त करण्यात आलं आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेत जावेदचे घर तोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिंसाचाराचा मुख्य आरोपी जावेद मोहम्मद याच्या घराची रविवारी सकाळी पोलिसांनी छापेमारी केली. त्याच्या घरातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आल्या आहेत. यासह काडतूसं आणि काही कागदपत्रंही जप्त केली आहेत.