वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली, त्याचा हात गेटमध्ये फसला…मग पुढे काय झाले

Vande Bharat Express : अल्पवधीत लोकप्रिय झालेली वंदे भारत एक्स्प्रेस सर्वत्र सुरु करण्याची मागणी होत आहे. या गाडीला स्वयंचलीत दरवाजे आहे. या दरवाज्यांमुळे एक अपघात झाला. एका व्यक्तीचा हात गाडीच्या दरवाज्यात अडकला.

वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली, त्याचा हात गेटमध्ये फसला...मग पुढे काय झाले
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 3:59 PM

आग्रा : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. देशातील सेमी हायस्पीड समजली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन लोकप्रिय झाली आहे. देशभरात आता १५ ठिकाणांहून हे ट्रेन धावत आहे. परंतु या ट्रेनच्या अपघाताच्या बातम्या अधूनमधून येत आहेत. मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसच्या इंजिनाला म्हशीने धडक दिली होती. त्यावेळी इंजिनचा मोठा भाग फुटला होता. त्यानंतर तीन ते चार वेळा असे अपघात झाले होते. परंतु आता वेगळाच अपघात झाला आहे.

नेमके काय झाले

उत्तर प्रदेशातील आग्रा कँट स्टेशनमध्ये हा अपघात झाला. एका प्रवाश्याचा हात वंदे भारत एक्स्प्रेसच्या गेटमध्ये अडकला आणि ट्रेन तीन किलोमीटरपर्यंत चालत गेली. हात गेटच्या बाहेर आल्यामुळे ते वाचले. बल्केश्वर येथील प्रदीप आपल्या परिवारासह ग्वालियरला जात होता. त्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट त्यांनी बुक केले होते. नवी दिल्ली ते भोपळ दरम्यान धावणाऱ्या ट्रेनसाठी ते ४.३० वाजता स्टेशनवर पोहचले. आग्रात ट्रेनला दोन मिनिटांचा थांबा आहे आणि दरवाजे उघडण्यास ३० ते ४० सेंकद लागतात.

हे सुद्धा वाचा

असा झाला अपघात

दरवाजे उघडल्यावर प्रदीप यांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. आधी सामान ट्रेनमध्ये टाकले. त्यानंतर पत्नी आणि मुलीस चढवण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेन सुरु झाली. मग प्रदीप यांनी गेटमधून सामान उतरवण्यास सुरुवात केली. परंतु त्यावेळी गेट बंद झाले आणि त्यांचा हात गेटमध्ये फसला. ट्रेन सुरु झाली. तीन किलोमीटरपर्यंत प्रदीप यांना ट्रेनने ओढत नेले. त्यांचे पाय व गुडघे सोलले गेले. हे द्दश्य पाहून स्टेशनवरील यात्रेकरुंनी आरडाओरड सुरु केली.

गेटमधून बाहेर आला हाथ

प्रदीप यांचा हात गेटमधून बाहेर आला. प्लॅटफॉर्मवर आरपीएफ व जीआरपी जवान पोहचले. त्यांनी प्रदीप यांना उठवले. परंतु या अपघातात त्यांची एक बॅग ट्रेममध्येच गेली. यासंदर्भात त्यांनी स्टेशन प्रबंधकाकडे तक्रार केली.

पाच मिनिटांचा हॉल्ट करा

वंदे भारत एक्स्प्रेस दोन मिनिटे थांबते. त्यातील ३० ते ४० सेंकद गेट उघडणे व बंद होण्यात जातात. यामुळे दीड मिनिटांमध्ये प्रवाशी उतरणे व चढणे शक्य होत नाही. यामुळे या ट्रेनचा हॉल्ट पाच मिनिटे करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्टेशन प्रबंधक प्रशस्ती श्रीवास्तव यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.