Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदे भारत ट्रेन विदेशातील रेल्वे ट्रॅकवरही धावणार, रेल्वे मंत्र्यांनी सांगितले कधीपासून निर्यात होणार

vande bharat express | देशात सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला चांगले यश मिळाले. या यशानंतर आता वंदे भारत ट्रेनला विदेशातही मागणी सुरु झाली आहे. सध्या भारतात ८२ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. तसेच आता वंदे भारत गाड्यांचा वेग वाढवण्याचे कामही सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

वंदे भारत ट्रेन विदेशातील रेल्वे ट्रॅकवरही धावणार, रेल्वे मंत्र्यांनी सांगितले कधीपासून निर्यात होणार
Vande bharat expressImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 7:55 AM

नवी दिल्ली, दि. 17 फेब्रुवारी 2024 | गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा विकास वेगाने झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन प्रवाशांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. भारतात या ट्रेनचे नेटवर्क वाढत आहे. महाराष्ट्रातील काही मार्गांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. सध्या देशांत 82 वंदे भारत एक्‍सप्रेस धावत आहे. त्यात या वर्षभरात आणखी वाढ होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला भारतातच नव्हे तर विदेशातही मागणी वाढत आहे. सेमीहायस्पीड ट्रेन आणि अनेक सुविधांमुळे जगभरात वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना आकर्षित करत आहे. यामुळे सरकार आता या ट्रेनची निर्यात करणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत संदर्भात विदेशातून मागणी आली आहे. लवकरच या ट्रेनची निर्यात सुरु होणार असल्याचे म्हटले आहे.

लवकर होणार निर्यात

एका कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारताने वंदे भारत ट्रेनला स्वदेशी डिझाइन आणि उत्तम कार्यक्षमतेसह तयार केली आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील युनिट्सकडून तिचे काम झाले आहे. आपण भारतीय अभियंत्यांच्या मदतीने आपल्या देशात वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे आव्हान पेलले आहे. आता ही ट्रेन येत्या काही वर्षांत निर्यात करण्यात येणार आहे.

भारतात सध्या ८२ वंदे भारत एक्सप्रेस

सध्या भारतात ८२ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. तसेच आता वंदे भारत गाड्यांचा वेग वाढवण्याचे कामही सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा मार्गावर वंदे भारत गाड्या ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅक चांगले केले जात आहे. एनडीए सरकार आल्यानंतर रोज १५ किलोमीटर रेल्वे ट्रॅक तयार होत आहे. यापूर्वी २००४ ते २०१४ दरम्यान रोज चार किलोमीटर रेल्वे ट्रॅक तयार होत होते. मागील दहा वर्षांत ४१ हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्क तयार केला गेला आहे. २००४ ते २०१४ दरम्यान रेल्वेत गुंतवणूक १५ हजार ६७४ कोटी रुपये होती. ती २०२४-२६ दरम्यान २ लाख ५२ हजार कोटी रुपये झाली आहे.

हे सुद्धा वाचा

वंदे भारत ही भारतातील नव्या युगाची ट्रेन आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे.

हे ही वाचा

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, सहा कोचचे नुकसान, प्रवाशी दहशतीत

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.