नवविवाहित व्यक्तीला Viagra घेणं महाग पडलं, थेट हॉस्पिटलमध्ये भरती, पत्नी गेली घर सोडून
जितक्या प्रमाणात हे औषध घेतलं पाहिजे, त्यापेक्षा तो जास्त या औषधाचं सेवन करत होता. व्हायग्राचा ओव्हरडोस झाल्यामुळे या माणसाला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
मुंबई: लग्नाआधी किंवा नंतर शरीरसंबंधांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही जण व्हायग्रा या औषधाचे सेवन करतात. व्हायग्रा या औषधाचा (Drug) वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. पण काही जण डॉक्टरांकडे न जाता परस्पर स्वत:च किंवा मित्रांच्या सल्ल्याने अशी औषध घेतात. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) एका व्यक्तीला व्हायग्रामुळे रुग्णालयात दाखल कराव लागलं. लग्नानंतर शरीरसंबंध ठेवताना चांगल्या कामजीवनासाठी व्हायग्राचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवया असं औषध घेणं, कधीही महाग पडू शकतं. उत्तर प्रदेशात एका व्यक्तीच्या बाबतीत नेमकं हेच झालय. डॉक्टरांनी आता त्याच्यावर उपचार केले असले, तरी व्हायग्राचा साईड इफेक्ट आयुष्यभर सोबत रहाणार आहे. काही महिन्यापूर्वीच या माणसाचं लग्न झालं होतं. मित्राच्या सल्ल्याने त्याने व्हायग्रा घ्यायला सुरुवात केली होती.
दररोज किती प्रमाणात व्हायग्रा घेत होता?
जितक्या प्रमाणात हे औषध घेतलं पाहिजे, त्यापेक्षा तो जास्त या औषधाचं सेवन करत होता. व्हायग्राचा ओव्हरडोस झाल्यामुळे या माणसाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. डॉक्टरांकडे न जाता परस्पर मित्रांच्या सल्ल्याने या माणसाने व्हायग्राचा डोस वाढवला. तो दररोज 200 MG एवढ्याप्रमाणात हे औषध घेत होता. म्हणजे निर्धारित प्रमाणापेक्षा चारपट जास्त प्रमाणात तो या औषधाचे सेवन करत होता.
पत्नी निघून गेली
व्हायग्राच्या अतिसेवनाचे अखेर शरीरावर दुष्परिणाम झाले. पत्नीसुद्धा त्याच्या सवयीला कंटाळली व त्याला सोडून माहेरी निघून गेली. अखेर नवऱ्यामुलाच्या कुटुंबाने समजूत काढल्यानंतर ती परत आली. पण त्या माणसाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती परत निघून गेली.
आयुष्यभर रहाणार साईड इफेक्ट
रुग्णालयातील डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण तरीही आयुष्यभर त्याला साईड इफेक्टचा सामना करावा लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तो माणूस बाप बनू शकतो. पण प्रायव्हेट पार्टची सूज कमी होणार नाही. सूजलेला भाग लपवण्यासाठी त्याला टाइट कपडे घालावे लागतील.