VIDEO: “भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरही हतबल होऊन आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करावी लागलीय. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

VIDEO: भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 7:16 AM

लखनौ : उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था हा कायमच वादग्रस्त विषय राहिलाय. इतरवेळी हतबल असणाऱ्या सामान्य लोकांच्या व्यथा समोर आल्या आहेत. मात्र, आता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरही हतबल होऊन आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करावी लागलीय. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात संबंधित अधिकारी भाजपच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांवर आपल्याला थोबाडीत मारण्याचा आणि हिंसा भडकवण्यासाठी बॉम्ब आणल्याचा आरोप करताना दिसत आहे. यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत (Video Allegation of slapping Police office and bomb with BJP MLA and supporters UP).

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी लाठीकाठ्यांपासून बॉम्बपर्यंत वापर होऊन हिंसा भडकली. विशेष म्हणजे या परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासनावरही हल्ले होताना दिसत आहेत.

पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. त्यात ते फोनवर वरिष्ठांशी बोलताना परिस्थितीची माहिती देत आहेत. ते सांगत आहेत, “हे लोक विटा आणि दगडफेक करत आहेत. त्यांनी मला थोबाडीतही मारली. त्यांनी त्यांच्यासोबत बॉम्बही आणले आहेत. हे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. यात भाजप आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे.” हा व्हिडीओ ईटवाह जिल्ह्यातील आहे.

हेही वाचा :

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

“भाजपला मास्टरस्ट्रोक आवश्यक, यूपी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र फोडणे गरजेचा”

व्हिडीओ पाहा :

Video Allegation of slapping Police office and bomb with BJP MLA and supporters UP

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.