पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. भाजपसह, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसनंही दंड थोपटले आहेत. अशावेळी आता काँग्रेसनंही जोर लावायला सुरुवात केलीय. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी गोव्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी दुचाकीवरुन प्रवास करताना पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. (Rahul Gandhi’s trip to Goa on a two-wheeler, criticism of Modi government over petrol-diesel price hike)
गोव्यात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी गोव्यातील मोटारसायकल टॅक्सी पायलटची सवारी केली. यावेळी पणती ते फोंटा दरम्यान त्यांनी दुचाकीवरुन प्रवास केला. सुरक्षाव्यवस्था नाकारुन राहुल गांधी यांनी दुचाकीवरुन प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. दुचारी प्रवासाचा राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. दरम्यान, देशात यूपीए सरकार होतं तेव्हा पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे भाव यूपीए काळापेक्षाही स्वस्त आहेत. पण लोकांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलीय.
How best to connect with our people? Reach out to them when they are in their comfort zone.
Shri @RahulGandhi setting examples for all leaders in India to follow.#RahulGandhiWithGoa pic.twitter.com/rX04X7tAlw
— Congress (@INCIndia) October 30, 2021
काँग्रेसकडून ट्विटर हँडलवर राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दुचाकीवरुन बंबोलिम ते आझाद मैदानात असा प्रवास केल्यानंतर राहुल गांधी यांनी मच्छिमांचीही भेट घेतली. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात काय आहे? हे जाणून घेण्यासाठी मी आलोय. यावेळी काँग्रेसच्या गोव्यातील रणनितीबाबतही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. गावातील लोकांचा आवाज आणि त्यांच्या हिताची रक्षा हीच आमची रणनिती असेल, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसही गोवा विधानसभेच्या मैदानात उतरली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “गोवा आणि पश्चिम बंगालला फुटबॉल आवडतो. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आमचा नारा ‘खेला होबे’ होता. यावेळी आम्हाला गोव्यात नवी पहाट पहायची आहे. ममता गोव्यात नवीन पहाट कशी करणार, असं म्हणत असाल तर मी कुठेही जाऊ शकते. माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे,” असं ममता बॅनर्जी गोव्यात बोलताना म्हणाल्या.
“माझं शेतकऱ्यांवर, मच्छिमारांवर आणि संपूर्ण गोव्यावर प्रेम आहे. मी पहिल्यांदाच राजकीय हेतूने गोव्यात आलेली नाही. मी यापूर्वी देखील गोव्याला भेट दिली आहे. तीन वर्षांपूर्वी गोव्याला आले होते. मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मी इथे तुमच्या राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी आलेली नाही. लोक अडचणीत येतात तेव्हा आपण त्यांना मदत करू शकलो, तर त्याचा मला आनंद आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही तुम्हाला मदत करू,” असं आश्वासन ममता यांनी यावेळी दिलं.
Today is my second day in Goa and this state already has my heart! The energy is electrifying, the love – heartwarming!
Sharing a few special moments from the day… Thank you Goa! pic.twitter.com/ibVz9x6UMp
— Mamata Banerjee (@MamataOfficial) October 30, 2021
इतर बातम्या :
राष्ट्रवादीनं ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करावी, भाजपचं आव्हान; कलानींचं स्पष्टीकरण काय?
Rahul Gandhi’s trip to Goa on a two-wheeler, criticism of Modi government over petrol-diesel price hike