Video : जेव्हा अमित शाहांनी काश्मिरी गाववाल्याला सांगितलं, मला फोन करु शकता !
अमित शाह यांनी आज सीमेजवळील मकवाल गावात भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला. इतकंच नाही तर शाह यांनी एका नागरिकाला आपला मोबाईल नंबरही दिला आहे. आपला फोन नंबर देताना शाह म्हणाले की, तुम्ही हवं तेव्हा मला फोन करु शकता!
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवाद्यांकडून हत्याकांडांचं सत्र सुरु आहे. अशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जम्मू-काश्मिरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू-काश्मिरचा दौरा करत आहे. शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जम्मू-काश्मिरची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाह यांनी आज सीमेजवळील मकवाल गावात भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला. इतकंच नाही तर शाह यांनी एका नागरिकाला आपला मोबाईल नंबरही दिला आहे. आपला फोन नंबर देताना शाह म्हणाले की, तुम्ही हवं तेव्हा मला फोन करु शकता! (Amit Shah inspects Makwal border, Dhah gave a phone number while interacting with villagers)
अमित शाह आज जम्मूच्या मकवाल सीमेवर पोहोचले. तिथे त्यांनी भारतीय लष्करातील जवानांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शाह म्हणाले की तुम्ही कुठलीही चिंता न करता देशाची सेवा करा. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार तुमच्या परिवाराची काळजी घेईल. त्यानंतर शाह यांनी मकवालच्या रहिवाशांसोबतही संवाद साधला. एका खाटेवर बसून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. तसंच गावातील घरांचीही शाह यांनी पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांशी गप्पा मारताना शाह यांनी एका गावकऱ्याला आपला मोबाईल नंबर देत, तुम्ही मला फोन करु शकता, असं सांगितलं.
#WATCH | J&K: Union Home Minister Amit Shah takes the contact number of a local resident of Makwal border in Jammu, shares his own and tells him that the man can contact him whenever he needs.
The Home Minister visited the forward areas of Makwal border today. pic.twitter.com/KJnI9zEsSD
— ANI (@ANI) October 24, 2021
अमित शाहांनी पुढे केले मैत्रीचा हात
अमित शाह यांनी आपल्या तीन दिवसीय काश्मिर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी श्रीनगरमध्ये जनसभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी व्यासपीठावरुन बुलेट प्रुफ ग्लास शिल्ड हटवलं. शाह म्हणाले की, ‘तुम्ही सर्वजण आपल्या मनातील भीती आणि दहशत काढून टाका. काश्मिरची शांती आणि विकासाच्या यात्रेत आता कुणी बाधा आणू शकत नाही. मला अनेकदा ताणे मारले गेले, निंदा केली गेली…. आज मी तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधू इच्छित आहे. त्यामुळेच कोणतीही कुलेट प्रुफ सुरक्षा नाही’.
अमित शाह यांनी आज श्रीनगरमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. त्यानंतर आयोजित एका सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, काश्मिर घाटीच्या युवकांना भरकटवण्याचं काम केलं जात आहे. त्यांच्या हाती शस्त्र आणि दगड दिले जात आहेत. युवकांनी चांगल्या मार्गावर चालण्याची गरज आहे. त्यामुळे जम्मू-काश्मिरमध्ये विकासाची लाट निर्माण होईल, असंही शाह म्हणाले.
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में जम्मू-कश्मीर में विकास के नये युग की शुरुआत हुई है।
मुझे कुछ लोग सलाह दे रहे हैं कि सरकार इनसे बात करे, उनसे बात करे…मैं उनसे कहना चाहता हूं कि मैं बात करूंगा तो सिर्फ घाटी के अपने भाइयों-बहनों और युवा साथियों के साथ बात करूंगा। pic.twitter.com/WSc7OyBlSR
— Amit Shah (@AmitShah) October 25, 2021
शाहांचा पाकिस्तानवर घणाघात
‘आज काश्मिरच्या युवकांना मी आवाहन करतो की ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले होते, त्यांनी तुमचं भलं केलं का? पाकव्याप्त काश्मिर तुमच्या जवळ आहे. तिथे विचारा की गावात वीज आली का? रुग्णालय आहे का? वैद्यकीय महाविद्यालय बनत आहे का? गावात पिण्याचं पाणी आहे का? महिलांसाठी शौचालय आहेत का? तिथे काहीही चांगलं झालेलं नाही आणि हे लोक पाकिस्तानची भाषा करतात’, अशा शब्दात अमित शाह यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला.
मैं कश्मीर के युवाओं से अपील करने आया हूँ कि जिन्होंने आपके हाथ में पत्थर पकड़ाए थे, जिन्होंने आपके हाथ में हथियार पकड़ाए थे, उन्होंने आपका क्या भला किया?
आप उनसे पूछिये वो लोग जहाँ की बात करते हैं वहाँ बिजली है क्या, पीने का साफ पानी है क्या, शौचालय, घर व गैस कनेक्शन है क्या? pic.twitter.com/Uo7qpoew6h
— Amit Shah (@AmitShah) October 25, 2021
जम्मू-काश्मिरमधील इंटरनेट सेवा का बंद केली?
5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना शाह म्हणाले की, इंटरनेट बंद केलं नसंत तर काही लोक तरुणांना भडकावण्याचं काम करतात आणि त्यात अनेकांचा जीव गेला असता. आता काश्मिरच्या लोकांना घाबरण्याची गरज नाही. काश्मिर पंतप्रधान मोंदींच्या हृदयात वसतं. त्यामुळे काश्मिरच्या विकासात बाधा आणणाऱ्या लोकांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असा इशारा शाह यांनी दहशतवादी संघटना आणि विरोधकांना दिलाय.
जो कहते हैं कि 5 अगस्त के बाद कर्फ्यू क्यों लगाया, इंटरनेट क्यों बंद किया…मैं आप से कहना चाहता हूँ कि अगर हम ये कदम न उठाते तो ये लोगों की भावनाओं को भड़काते जिससे नुकसान हमारे कश्मीरी भाईयों का होता।
इतने लोगों की जान गई लेकिन इन्होने कभी दहश्तगर्दों के खिलाफ आवाज नहीं उठाई। pic.twitter.com/8DGm5IsW7b
— Amit Shah (@AmitShah) October 25, 2021
इतर बातम्या :
पंतप्रधान मोदी लाँच करणार 64 हजार कोटींची हेल्थ इन्फ्रा स्कीम, जाणून घ्या सर्वकाही
भारताने पाकिस्तान विभाजनाचा प्लॅन 1965 पासूनच सुरू केला होता- नौदल अधिकारी अनिल कुमार चावला
Amit Shah inspects Makwal border, Dhah gave a phone number while interacting with villagers