Video : ‘वो है गलवान के वीर…’ गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली

गलवान खोऱ्यातील चकमकीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय. वो है गलवान के वीर... या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Video : 'वो है गलवान के वीर...' गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली
गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 6:31 PM

मुंबई : आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैन्यात हिंसक झडक झाली होती. यात 20 भारतीय जवान शहीद झाले. भारतीय लष्कराने त्याबाबत माहिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे या झडपेत एकही गोळी चालवली गेली नव्हती. मात्र, या रक्तरंजित संघर्षात आपल्या 20 जवानांना वीरमरण आलं. तर चीनच्या सैन्याचंही मोठं नुकसान जाल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं होतं. या चकमकीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय. वो है गलवान के वीर… या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. (one year Completes of Galwan Valley clash, Indian Army pays homage to martyred)

15 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?

भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. त्यात दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली. चर्चेत ठरल्याप्रमाणे चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत अडून मागे जाण्यास सांगण्यात आलं. मात्र, शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.

15 जूनच्या रात्री भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. त्यावेळी चीन सैनिकांच्या तुलनेत भारतीय सैनिकांची संख्या कमी होती. त्यावेळी चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे 20 जवान जखमी झाले. त्यानंतर 16 जून रोजी सकाळी भारतीय सैन्याने याबाबत माहिती दिली. त्यात एका अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झाल्याचं सांगण्यात आलं.

त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात जवळपास 3 तास ही हिंसक झडप सुरु होती. चीनच्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांना परत आणण्यात आलं मात्र 20 पैकी 17 जवान गंभीर जखमी होती. तर एका अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झाल्याची माहिती 16 जून रोजी सकाळी मिळाली होती. मात्र, या हल्ल्यात भारतीय लष्कराचे एकूण 20 जवान शहीद झाल्याचं नंतर सांगण्यात आलं. तसंच चीन सैन्याचंही मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण चीनकडून त्याबाबत अधिकृत माहिती कधीही देण्यात आली नाही.

45 वर्षांनी शांतता कराराचा चीनकडून भंग

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

संबंधित बातम्या :

‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस!

चीनची लस घेतल्यास सौदी अरबमध्ये ‘नो एन्ट्री’, पाकिस्तानचीही चिंता वाढली

one year Completes of Galwan Valley clash, Indian Army pays homage to martyred

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.