AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : वाराणसीत दिसला पंतप्रधान मोदींचा खास अंदाज; काशी विश्वनाथाचं दर्शन, ‘डमरू’ही वाजवला

पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीमध्ये प्रचंड मोठा रोड शो केला. या रोड शोला भाजप कार्यकर्ते आणि मोदींच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रोड शो नंतर पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान मोदींचा खास अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी डमरू वाजवला.

Video : वाराणसीत दिसला पंतप्रधान मोदींचा खास अंदाज; काशी विश्वनाथाचं दर्शन, 'डमरू'ही वाजवला
काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींनी डमरू वाजवलाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 1:36 AM

वाराणसी : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीमध्ये प्रचंड मोठा रोड शो केला. या रोड शोला भाजप कार्यकर्ते आणि मोदींच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रोड शो नंतर पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात(Kashi Vishwanath Temple) दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान मोदींचा खास अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी डमरू वाजवला.

काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काशी विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं स्वागत पुजाऱ्यांना डमरू वाजवून केलं. मंदिराच्या बाहेर मोदींनी पुजाऱ्यांच्या हातून डमरू घेत स्वत: वाजवलं. पंतप्रधान मोदींचे डमरू वाजवतानाचे व्हिडीओ आणि फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदींचं हे रुप यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळालं आहे. मोदी सातत्याने अशा प्रकारच्या बातम्यांमधून चर्चेत असतात.

पंतप्रधान मोदींचा परंपरा जपण्याकडे कल

पंतप्रधान मोदी हे ज्या राज्यात जातात, जिथे सभा किंवा रॅली करतात तेखील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रादेशिक भाषेत संवाद साधतात. गुजरातमध्ये गुजराती, महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात करतात. तसंच तेथिल महान पुरुषांना अभिवादन करतात. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी आपण गेलेल्या भागातील परंपरा जपण्याचाही प्रयत्न करतात. त्याचाच भाग म्हणून ते विविध पेहराव, टोपी घातलेले आणि विविध प्रकारची वाद्य वाजवताना पाहायला मिळतात. जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी त्रिपुरा आणि मणिपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही मोदींनी त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवली होती. त्यावेळी मोदींनीही कलाकारांमध्ये जाऊन ढोल वाजवला होता.

इतर बातम्या :

Chennai Mayor | चेन्नईत प्रथमच दलित महिला महापौर, Priya Rajan यांच्याकडे 28 व्या वर्षीच महापालिकेची सत्ता!

Photo Gallery: यूपीत ‘मोदी वादळ’, पंतप्रधानांच्या रोड शोला 3 किलोमीटरपर्यंत तुफान गर्दी; गर्दी इतकी की नजरच हटेना!

'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.