‘आप’चे ‘पाप’ थेट चव्हाट्यावरच; आमदाराच्या पीएने इतक्या लाखाची घेतली लाच…
आपच्या आमदाराच्याच पीएला थेट लाच घेताना पकडले गेल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. त्यामुळे भाजप नेते शहाज पूनावाला यांनी भगवंत मान सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नवी दिल्लीः पंजाबमधील भटिंडा येथील दक्षता पथकाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमित रतन यांचा स्वीय सहाय्यक रेशम गर्ग याला भटिंडा सर्किट हाऊसमधून 4 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार अमित रतन कोटफट्टा यांचीही चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप अधिकृतरित्या अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या वाहनातून लाचेची रक्कम मिळाल्यापासून भटिंडा सर्किट हाऊसमध्ये जोरदार नाट्यमय घटना घडामोडी घडत आहे.
आपच्या आमदाराच्याच पीएला थेट लाच घेताना पकडले गेल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. त्यामुळे भाजप नेते शहाज पूनावाला यांनी भगवंत मान सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
त्यांनी ट्विट करून म्हटले की, पुन्हा एकदा तुमचे ‘पाप’ उघड झाले आहे. अनेक मंत्र्यांनंतर आता भटिंडाचे आमदारही लाच घेताना रंगेहात पकडले गेल्याने दिल्लीतही ‘आप’ने भ्रष्टाचाराचे नवे विक्रम प्रस्थापित केले असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार अमित रतन कोटफट्टा यांच्या कारमधून 4 लाख रुपयांची लाच वसूल करण्यात आली आहे. त्यानंतर आमदारालाही भटिंडा येथील सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
पंजाबचे भाजप नेते राज कुमार वेरका यांनी या प्रकरणी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून भ्रष्टाचाराबाबत भगवंत मान सरकार यांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक दिसून येतो आहे अशी टीका राजकुमार वेरका यांनी म्हटले आहे.
अटकेनंतर पंजाब व्हिजिलन्स ब्युरोच्या प्रवक्त्याने या प्रकरणाची संपूर्ण माहिती देताना सांगितले की, आपच्या आमदारांचे पीए रेशन गर्ग हे पटियालाच्या सामनाचे रहिवासी आहेत.
भटिंडा जिल्ह्यातील संगत ब्लॉकमधील गुहा गावच्या सरपंच सीमा राणी यांचे पती प्रितपाल कुमार यांच्या तक्रारीच्या आधारे गर्गला अटक करण्यात आली आहे.
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, गर्गने सीमाकडे 25 लाख रुपयांचा सरकारी निधी देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र 5 लाखांची लाच देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्याप्रकरणी तक्रारदाराने यापूर्वीच 50 हजारांची लाच घेतल्याचे सांगितले असून बाकीचे पैसे तो सातत्याने मागत होता.