रेल्वेत असे काय घडले, टीटीई चेन पुलिंग करुन पळू लागला, आरपीएफने पकडल्यावर…

रेल्वे चेन पुलिंग आणि अवैध पद्धतीने प्रवाशांकडून पैसे घेतल्यामुळे टीटीई टीटीई अनुदीप, टीटीई आनंद कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. चेन पुलिंग करणाऱ्या टीटीईची आरपीएफकडून चौकशी सुरु आहे. आरपीएफचे अधिकारी बी.पी. सिंह यांनी चौकशी दरम्यान चेन पुलिंग केल्याचे टीटीईने मान्य केल्याचे म्हटले आहे.

रेल्वेत असे काय घडले, टीटीई चेन पुलिंग करुन पळू लागला, आरपीएफने पकडल्यावर...
railway file photo
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 11:18 AM

भारतीय रेल्वेतून रोज लाखो लोक प्रवास करत असतात. आरक्षण केल्यानंतर सर्वांचा संबंध टीटीईशी येत असतो. तसेच ज्यांना आरक्षण मिळत नाही, ते टीटीईकडून येणकेन प्रकारे बर्थ मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. रेल्वेत चेन पुलिंगचा प्रकार प्रवाशांकडून कधीतरी होत असतो. परंतु रेल्वेतील टीटीईने चेन पुलिंग केली आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत, असेल तर काय असणार हा प्रकार? असा संशय सर्वांना येईल. नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. या गाडीत व्हिजलन्सची टीम (vigilance team) म्हणजे दक्षता पथक पोहचताच टीटीई चेन पुलिंग करुन पळू लागला. त्याने आपल्याकडील बॅग वेटरकडे दिली आणि धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफने त्याला पकडले. यावेळी दुसऱ्या टीटीईकडे 13,500 रुपये जास्त मिळाले.

अर्धा तास उभी राहिली ट्रेन

टीटीई आनंद कुमार हा शताब्दी एक्स्प्रेसमध्ये होता. यावेळी औरैया ते फफूंद रेल्वे स्टेशन दरम्यान व्हिजलन्सची टीम गाडीत पोहचली. व्हिजलन्स पथकाला पाहून आनंद कुमार घाबरला. त्याने चेन पुलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार केला. आपल्याकडे असणारी पैशांची बॅग वेटरकडे दिली आणि पळ काढला. परंतु आरपीएफ जवानांनी त्याला पकडले. यावेळी या रेल्वेतील दुसऱ्या टीटीई अनुदीप याच्याकडे बेहिशोबी 13,500 रुपये मिळाले. टीटीईकडून अतिरिक्त पैसे मिळाल्यामुळे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना अवैध पद्धतीने तिकीट दिल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकारणामुळे गाडी अर्धा तास उभी राहिली.

निलंबनाची कारवाई होणार

रेल्वे चेन पुलिंग आणि अवैध पद्धतीने प्रवाशांकडून पैसे घेतल्यामुळे टीटीई टीटीई अनुदीप, टीटीई आनंद कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. चेन पुलिंग करणाऱ्या टीटीईची आरपीएफकडून चौकशी सुरु आहे. आरपीएफचे अधिकारी बी.पी. सिंह यांनी चौकशी दरम्यान चेन पुलिंग केल्याचे टीटीईने मान्य केल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांदरम्यान टीटीईकडून होणारे उद्योग समोर आले आहे. नियमित धावणाऱ्या रेल्वेत हजारो जण प्रतिक्षा यादीवर असतात. त्या प्रतिक्षा यादीवरील लोकांना बर्थ न देता इतर लोकांना तिकीट दिले जात असल्याचा तक्रारी होत असतात. शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रकाराने ही बाब समोर आली आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.