AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बघता-बघता तो बेंचवर कोसळला..सायलेंट हार्ट ॲटकने विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू

Student Died due to Silent Heart Attack : इंदौरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. कोचिंग क्लासमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याचा सायलेंट हार्ट ॲटकने मृत्यू झाला. क्लासमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत बसलेला तो तरूण अभ्यास करत असतानाच बघता-बघता बेंचवर धाडकन कोसळला.

Video : बघता-बघता तो बेंचवर कोसळला..सायलेंट हार्ट ॲटकने विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 9:51 AM

इंदोर | 20 जानेवारी 2024 : आजकाल कमी वयातच लोकांना हार्ट ॲटक येण्याच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. देशभरात अशा दुर्दैवी मृत्यूच्याअनेक बातम्या समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका मध्यमवयीन इसमाला रेस्टॉरंटमध्ये जेवतानाच हार्ट ॲटक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत एक व्यक्तीला ट्रेनमध्ये प्रवास करतानाच हार्ट ॲटक आला. त्याचा झोपेतच मृत्यू झाला, तरी त्याच्या कुटुंबियांना , पत्नीला समजलं नाही, तब्बल 13 तास ती पतीच्या मृतदेहासमोबत प्रवास करत होती. अशा एक ना अनेक हादरवणाऱ्या घटना समोर येत असतानाच मध्य प्रदेशच्या इंदौरमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. कोचिंग क्लासमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याचा सायलेंट हार्ट ॲटकने मृत्यू झाला.

क्लासमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत बसलेला तो तरूण अभ्यास करत असतानाच बघता-बघता बेंचवर धाडकन कोसळला. त्याला नेमकं काय झालं हे त्याच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना कळलंच नाही. पण तो खाली कोसळला तो उठलाच नाही आणि ते पाहून क्लासमध्ये कल्लोळ माजला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या तरूणाच्या घरात तर स्मशानशांतता पसरली आहे. तरूण मुलाच्या जाण्याचे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

व्हिडीओ आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भंवरकुआन येथील आहे. राजा लोधी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सागरचा रहिवासी होता. राजा लोधी हा मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. यासाठी त्याने इंदूरमध्ये खाजगी कोचिंग सेंटरही लावले होते. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी राजा कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी आला आणि वर्गमित्रांसोबत जाऊन बसला. काही वेळ तो नीट बसला होता, पण अचानक त्याला काही होऊ लागलं आणि त्याच डोकं झुकंल. पाहता-पाहता तो बेशुद्ध पडला आणि बेंचवर कोसळला.

त्याच्या शेजारच्या मुलाला वाटलं की तो झोपलाय, पण मध्येच त्याचं डोक वर झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसू लागल्या, तो परत कोसळला. त्याची तब्येत बिघडल्याचं आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना समजलं आणि त्यांनी क्लासमधील सरांना या गोष्टीची कल्पना दिली. त्यामुळे मित्रांनी तत्काळ त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनमुळे परिसरात एकच खळबळ माजली.

डॉक्टरांनी राजाला तातडीने दाखल करून उपचार सुरू केले. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मात्र बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरं कारण समोर येईल.

पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.