Kashmir: गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार मिळाल्याने दहशतवादी भडकले, हल्ले अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा

त्यात सरकारी कर्मचारी, बिझनेसमॅन, मजूर, भिकारी, पर्यटक, जम्मू काश्मीर पोलीस, निमलष्करी दल, स्थानिक माहिती देणारे गद्दार या सगळ्यांना लक्ष्य करण्यात येईल, असे या साईटवर लिहिण्यात आले आहे. इतकेच नाही तर या परप्रातियांची घरे आणि तळे उद्ध्वस्त करण्यात येतील, जाळण्यात येतील असाही इशारा देण्यात आला आहे.

Kashmir: गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार मिळाल्याने दहशतवादी भडकले, हल्ले अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 8:31 PM

श्रीनगर- केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir)इतर राज्यातील मतदारांनाही मतदानाचा (voting rights) अधिकार दिलेला आहे. या घोषणेनंतर लष्कर-ए-तोयबा समर्थित दहशतवादी ग्रुप काश्मीर फाइटने गैर काश्मिरी नागरिकांवर हल्ले वाढवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या (terrorist)एका वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की – जेव्हा जिंकण्याचे मोठे कारण असते, तेव्हा मोठ्या संख्येने अनेकांचे प्राणही जातात. आमच्यापैकी कुणालाही हे आवडलेले नाही. मात्र हे सत्य आहे. सगळ्या गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की दिल्लीकडून हा घाणेरडा खेळ खेळला जातो आहे. अशा स्थितीत हल्लांची तीव्रता अधिक वाढवणे गरजेचे झाले आहे. आपल्या लक्ष्याप्रती प्राथमिकता देण्याची ही वेळ आहे. या पोस्टमध्ये कुणाला टार्गेट करणार याचीही माहिती देण्यात आली आहे.

कुणाकुणाला करणार टार्गेट?

यात लिहिण्यात आले आहे की, प्रत्येक परप्रांतीयाला हे हल्ले सहन करावे लागतील. त्यात सरकारी कर्मचारी, बिझनेसमॅन, मजूर, भिकारी, पर्यटक, जम्मू काश्मीर पोलीस, निमलष्करी दल, स्थानिक माहिती देणारे गद्दार या सगळ्यांना लक्ष्य करण्यात येईल, असे या साईटवर लिहिण्यात आले आहे. इतकेच नाही तर या परप्रातियांची घरे आणि तळे उद्ध्वस्त करण्यात येतील, जाळण्यात येतील असाही इशारा देण्यात आला आहे. आश्रितांच्या छावण्यांनाही टार्गेट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जम्मू आणि बाहेरच्या परिसरातही हे हल्ले करण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपा घाबरली, ओमर यांची प्रतिक्रिया तर मुफ्ती यांनीही केली टीका

निवडणूक आयोगाने केलेल्या या घोषणेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की- भाजपा निवडणुकांपूर्वीच घाबरलेली आहे. या राजकारण्यांना काश्मिरी जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, त्यामुळे बाहेरच्या लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची यांची तयारी दिसते आहे. तर माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की- पहिल्यांदा काश्मीरातील निवडणुका स्थगित करणे आणि आता बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे मतदार यादीत टाकणे, यामागे यांची काय मनिषा आहे, दिल्लीवाले काश्मीरवर कठोर शासन करु इच्छितात. असे त्यांनी लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे गणित?

केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मिरात 20 जिल्हे आहेत. यातले 10 जिल्हे जम्मूत आणि 10 जिल्हे काश्मीरमध्ये आहेत. इथली लोकसंख्या 1 कोटी 25 लाख 41 हजार 302 इतकी आहे. सगळ्यात मोठा जिल्हा किश्तवाड आणि सगळ्यात छोटा शोपिया जिल्हा आहे. सर्वाधिक शिक्षित लोक हे जम्मूत तर  कमी शिकलेले रामबनमध्ये आहेत. राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे 2 लाख 22 हजार 236 किमी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.