Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातेत सागर मीठ फॅक्टीरीची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 12 जणांचा मृ्त्यू, 18 गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

हलवदमधी जीआयडीसीत असलेल्या सागर सॉल्ट नावाच्या फॅक्टरीत ही दुर्घटना घडली. दुर्घटना झाली त्यावेळी तिथे ३० मजूर काम करत होते. काही मजुरांची मुलेही या ठिकाणी खेळत होती. ती मुलेही या ढिगाऱ्याखाली आले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

गुजरातेत सागर मीठ फॅक्टीरीची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 12 जणांचा मृ्त्यू, 18 गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Gujrat wall accident, 12dead
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 2:32 PM

मोरबी– (Morbi, Gujrat)एका मीठ कारखान्याची भिंत कोसळून (wall collapse)झालेल्या दुर्घटनेत किमान १२ कामगारांचा (12 dead)मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. एकूण ३० कामगार या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. दुर्घटनेतील मृतांना आणि जखमींना जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गुजरातमध्ये मोरबी जिल्ह्यात हलवदमध्ये एका मीठ कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे.

मुलंही जखमी झाली असल्याची शक्यता

हलवदमधी जीआयडीसीत असलेल्या सागर सॉल्ट नावाच्या फॅक्टरीत ही दुर्घटना घडली. दुर्घटना झाली त्यावेळी तिथे ३० मजूर काम करत होते. काही मजुरांची मुलेही या ठिकाणी खेळत होती. ती मुलेही या ढिगाऱ्याखाली आले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अद्याप कंपीनकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नेमका मुलांचा हा आकडा किती होता, याची माहिती नाही. सध्या मदतकार्य सुरु असले, तरी ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

स्थानिकांकडून मदतकार्य सुरु

ही भिंत पडून झालेल्या अपघातानंतर तिथे एकदम गोँधळ उडाला. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने मदकार्याला सुरुवात केली. दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. स्थानिक आमदार परषोत्तम सबरिया यांनाही ही माहिती कळाल्यानंतर तेही घटनास्थळी पोहचले, त्यानंतर मदतकार्याला वेग आला. यात ढिगाऱ्याखालून ज्या व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या, त्यांना तातडीनं उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी धावपळ करण्यात आली. ही भिंत नेमकी कोणत्या कारणामुळे पडली, या कारणांचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस चौकशी करीत आहेत.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.