फिरोजाबाद – फेसबुकचे (Facebook)व्यसन माणसांचं जगणं कसे प्रभावित करते आहे, याचे एक उदाहरणच समोर आले आहे. फेसबुकचा अतिापर आणि त्यावर फॉलोअर्स वाढवण्याची अतिव इच्छा यातून भयंकर कृत्य एका तरुणाने केले आहे. फॉलोअर्स वाढवण्यासाठी अटापिटा करणाऱ्या या तरुणाने, चक्क त्याच्या पत्नीचे अंघोळीचे फोटो (wife bath photos) स्वताच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड (uploaded) केलेत. हे जेव्हा पत्नीला कळाले तेव्हा तिचा भयंकर संताप झाला. तिने या प्रकरणात पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी थेट त्याचे फेसबुक अकाउंटच डिलिट करुन टाकले आहे.
हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशात फिरोजाबादमध्ये घडला आहे. फिरोजाबादमध्ये एका २६ वर्षीय तरुणीने, तिच्या २८ वर्षीय नवऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यात पत्नीच्या अंघोळाची व्हिडीओ या तरुणाने त्याच्या फेसबुक अकाऊंटला अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे की, तिचा पती हा दिल्लीत वास्तव्यास आहे. तो त्या ठिकाणी एका सर्कसमध्ये काम करतो. हा तरुण आपल्या पत्नीला अनेकदा व्हिडीओ कॉल करीत असे. त्याच दरम्यान तिचा अंघोळ करतानाचा एक व्हिडीओ त्याने रेक़ॉर्ड करुन घेतला आणि त्यानंतर स्वताच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केला.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर या तरुणाचे फेसबुक अकाऊंट डिलिट करण्यात आले आहे. या महिलेचा व्हिडीओ अधिक शेअर होऊ नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपी तरुणाच्या विरोधात गुनहाही नोंदवला आहे. संतापलेल्या पत्नीचे दावा केला आहे की तिचा पती सोशल मीडियाच्या व्यसनाच्या आधीन गेलेला आहे. स्वताचे सोशल मीडियावरील फॉलो्र्स वाढवण्यासाठी तो असे काही करेल, अशी कल्पना केली न्वहती, अशी प्रतिक्रियाही तिने दिली आहे. ज्यावेळी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर, तिचे स्वताचे अश्लील फोटो तिने पाहिले त्यावेळी तिला धक्काच बसला. त्यानंतर तिने फोन करुन हे फोटो आणि व्हिडीओ अकाऊंटवरुन डिलिट करण्यास त्याला सांगितले. मात्र त्याने तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे जाण्य़ाशिवाय पर्याय राहिला नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
अशा नवऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता पत्नीने केली आहे. त्याला अटक करुन तुरुंगात टाकण्यात यावे, असेही पत्नीने सांगितले आहे. फेसबुकच्या व्यसनापायी या तरुणाने जो घाणेरडा प्रकार केला आहे, त्याची आता चर्चा होते आहे. तर पोलिसांनी हे फेसबुक अकाउंट डिलिट केले असले तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या दोघांचेही जबाब नोंदवून घेणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. पत्नीने तक्रार करताना नवऱ्याचा जो मोबाईल नंबर दिला होता, तो वेगळ्याच माणसाचा आहे, हेही पोलिसांना पडलेले एक कोडे आहे. आता याचा तपास केल्यानंतरच याचे सत्य समोर येण्याची शक्यता आहे.