Fact Check: पोरं नारळाच्या झाडावर चढली, पाण्याचा प्रवाह आला, जमीन खचली आणि.
देशातील काही भागात चक्रीवादळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Watch Boy Falls Into River While Taking coconut)
मुंबई: देशातील काही भागात चक्रीवादळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे मुलंही नदी किनारी येऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भारताबाहेरचा आहे. या व्हिडीओत जे घडलं ते पाहाल तर तुम्हीही हादरून झालं. (Watch Boy Falls Into River While Taking coconut)
काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओत काही तरुण नदीच्या किनारी नारळाच्या झाडाजवळ जमा झालेले दिसत आहेत. दोन एक तरुण नारळाच्या झाडावर चढला असून तो नारळ काढताना दिसत आहे. झाडाच्या बाजूलाच भली मोठी नदी आहे. हा मुलगा झाडावर चढत असतानाच अचानक पाण्याचा प्रचंड लोट आला आणि जमीन खचली आणि झाडासह जमिनीचा काही भाग पाण्यात गेला. त्यामुळे झाडावर चढलेल्या तरुणाने झाडावरून उडी मारून जीव वाचवला. पण झाडाखाली उभा असलेला तरुण मात्र उलटासुलटा होत पाण्यात ढकलला गेला. काही कळायच्या आत हा तरुण आणि झाड पाण्यात एकरुप झाले. पाण्याचा प्रवाह अक्राळविक्राळ रुप धारण करून वाहत होता आणि जमलेले तरुण मात्र ओरडत होते.
व्हिडीओ कुठला?, कधीचा?
हा व्हिडिओ आजचा असल्याचं सांगितलं जातंय. मात्र प्रत्यक्षात हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. पावसाळा सुरू झाल्याने हा व्हिडीओ कुणी तरी शेअर केला असून त्यावर आजचाच व्हिडीओ असल्याचं भासवून व्हायरल केला आहे. तसेच हा व्हिडीओ केरळचा असल्याचंही सांगण्यात येतं. मात्र, त्यातील भाषेवरून हा व्हिडीओ एकतर तामिळनाडू किंवा पश्चिम बंगालकडचा असावा असा कयास बांधला जात आहे. मात्र हा व्हिडीओ colombia Antioquia municipalityचा असल्याचं आढळून आलं आहे.
लोकांनी काय करावं?
देशातील काही ठिकाणी चक्रीवादळाचा धोका असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच काही भागात यंदा मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक फेक व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता आहे. जुनेपुराने व्हिडीओ आजचेच सांगून ते व्हायरल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही अशा व्हिडीओवर विश्वास ठेवू नका. त्याची खातरजमा करा. चार वृत्तपत्रं, चॅनेल किंवा ऑनलाईन वेब साईटवर जाऊन चेक करा आणि मगच अशा गोष्टींवर विश्वास ठेवा. (Watch Boy Falls Into River While Taking coconut)
Fact Check : हा व्हिडीओ केरळमधील असल्याचं सांगितलं जातंय, पण हा व्हिडीओ जुना आणि परदेशातील आहे. #CycloneTauktae #Taukte #Tauktea #Maharashtra #kerala #Fake
संबंधित बातम्या:
Tauktae Cyclone LIVE | मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत यंत्रणा सज्ज
Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?
(Watch Boy Falls Into River While Taking coconut)