Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या छताला गळती का? निर्माण समितीने सांगितलं सत्य

Ram Mandir : मंदिराच्या छतामधून पाणी गळती होतेय असा दावा राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी सोमवारी केला. त्यावर आता मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलय. मंदिराच्या छतामधून पाणी का आणि कस गळतय? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलय.

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या छताला गळती का? निर्माण समितीने सांगितलं सत्य
Ram Mandir
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 12:22 PM

अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी सोमवारी मंदिराच्या छताला गळती लागल्याचा दावा केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच मंदिराच्या बांधकाम गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली. आता यावर राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी स्वत: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्यामुळे गळती होताना पाहिलय. मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच बांधकाम सुरु आहे, हे यामागे कारण आहे. संपूर्ण छत मोकळं आहे. त्यामुळे तिथे पाणी भरलं व छतामधून गळती झाली. दुसऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत छत बंद होईल. त्यानंतर हा प्रश्न निर्माण होणार नाही” असं नृपेंद्र मिश्र म्हणाले.

“मंदिराच्या गर्भगृहात स्वयंचलित पाणी काढण्याची व्यवस्था नाहीय. पाणी हातानेच काढाव लागतं. अन्य सर्व मंडपात उतरण आहे. पाणी काढण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यामुळे तिथे पाणी जमा होत नाहीय. राम मंदिर निर्माण समिती कोट्यवधी राम भक्तांना आश्वस्त करु इच्छिते की, मंदिर निर्माणात कुठली कमतरता नाहीय. कुठलही दुर्लक्ष झालेलं नाहीय” असं नृपेंद्र मिश्र म्हणाले.

मंदिराच्या छतामधून पाणी गळण्याची ही दुसरी वेळ का?

सोमवारी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निर्माण कार्यात बेजबाबदारपणा झाल्याचा आरोप केला होता. मंदिराच्या छतामधून पाणी गळण्याची ही दुसरी वेळ आहे, असा दावा केलाय. पहिल्या पावसातही मंदिराच्या छतामधून गळती झाली होती. त्यावेळी आचार्य सत्येंद्र दास यांनी विरोध केल्यानंतर पाणी काढून टाकण्यात आलं होतं. राम ललाच्या भव्य मंदिराच्या निर्माण कार्यात देशातील नामवंत इंजिनिअर काम करत आहे. मात्र, तरीही अशी परिस्थिती आहे असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले. मंदिराच्या छतामधून पाणी गळती ही हैराण करणारी बाब आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्या विरोधानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. समस्येच्या निराकरणासाठी विचार विमर्श, चर्चा केली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.