नवीन संसद आवारात घुसले पावसाचे पाणी; छताला पण लागली गळती, आता काँग्रेस ॲक्शन मोडवर

Lok Sabha, Rajya Sabha Water Logging : दिल्लीत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दमदार पावसाने नागरिक जीवन प्रभावित झाले आहे. तर दिल्लीत डौलाने उभी ठाकलेली नवीन संसद इमारतीत या पावसाच्या पाण्याने घुसखोरी केली आहे. तर नवीन संसदेच्या इमारतीला गळती लागली आहे.

नवीन संसद आवारात घुसले पावसाचे पाणी; छताला पण लागली गळती, आता काँग्रेस ॲक्शन मोडवर
दिल्लीत मुसळधार पाऊस, पाणी नवीन संसदेच्या उंबरठ्यावर
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 9:59 AM

दिल्लीत मुसळधार पावसाने कहर केला आहे. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. तर नुकतेच देशाच्या शिरपेचात भर घातलेल्या नवीन संसद भवनाच्या आवारातही पाणी घुसले आहे. संसदेच्या मकरद्वाराजवळ पाणी साचले आहे. संसदेत पाणी भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. आता काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे.

तुफान पावसामुळे दाणादाण

हे सुद्धा वाचा

दिल्लीत काल 31 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पाऊस झाला. काल रात्रभर पाऊस सुरुच होता. नवीन संसद भवनाच्या आवारातही पावसाने मोर्चा वळवला. या भागात पाणी साचले. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राममध्ये अनेक सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचले. मेट्रो स्टेशनबाहेर पाणी वाढल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

दोघांचा गेला बळी

दिल्लीत बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे 22 वर्षांची एक महिला आणि तिचा मुलगा नाल्यात पडला. या दोघांचा या घटनेत बुडून मृत्यू झाला. तर इतर घटनात दोघे जखमी झाले आहेत. रस्ते जलमय झाल्याने अनेक भागात नागरिकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागला. तर विमान सेवा आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली.

छताला पण लागली हो गळती

दिल्लीत झालेल्या पावसाने संसदेच्या आवारातच पाणी घुसले असे नाही तर नवीन इमारतीचे छतही गळत असल्याचे समोर आले आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर येथील काँग्रेसचे लोकसभेचे खासदार मणिकम टॅगोर यांनी याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहेर. त्यात नवीन संसद इमारतीच्या लॉबीमध्ये गळती लागल्याचे दिसून येत आहे.

हवामान विभागाचा रेड अलर्ट

दिल्लीतील काही भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. दिल्लीसह आसपासच्या गावांना, शहरांना हा इशारा देण्यात आला आहे. या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद या शहरांना येत्या काही तासात पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 30-35 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री 9 वाजेपर्यंत हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

काँग्रेसने दिली नोटीस

बुधवारी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सध्या संसदेत जातीय राजकारणावरुन सत्ताधारी आणि विरोधकात तुफान हल्लाबोल सुरु आहे. त्यातच दिल्लीत पावसाने थैमान घातले. या पावसाचे पाणी नवीन संसदेच्या आवारात पण घुसल्याचे दिसत आहे. त्यावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने नवीन संसद परिसरात पाणी शिरल्याच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाने या प्रकरणी नोटीस दिली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.