राहुल गांधी यांना घर मिळावं म्हणून भाजप मैदानात; चक्क पीएम आवास योजनेकडे केला अर्ज

राहुल गांधी यांनी रायपूरच्या काँग्रेस अधिवेशनला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी गेल्या 52 वर्षात माझ्याकडे घर नसल्याचं म्हटलं होतं. अलाबादपासून काश्मीरपर्यंत आमच्याकडे घर नाहीये, असं त्यांनी सांगितलं होतं.

राहुल गांधी यांना घर मिळावं म्हणून भाजप मैदानात; चक्क पीएम आवास योजनेकडे केला अर्ज
Rahul GandhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 8:45 AM

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या रायपूर येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याकडे घर नसल्याचं म्हटलं होतं. गेल्या 52 वर्षात आपल्याकडे एकही घर नाहीये, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्या घराची देशभर चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा सुरू असतानाच भाजपने एक वेगळीच गोष्ट केली आहे. राहुल गांधी यांना पीएम आवास योजनेतून घर आणि जमीन मिळावी म्हणून भाजपने चक्क अर्ज केला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

वायनाड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कलपेट्टा येथील नगर पालिकेच्या सचिवाला अर्ज दिला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना घर देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावं. त्यांना घर द्यावं आणि जमीनही द्यावी, अशी मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. भाजपचे वायनाड जिल्हाध्यक्ष केपी मधू यांनी हा अर्ज केला आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांना कलपेट्टामध्ये एक घर आणि जमीन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्याच्या केंद्रस्थानीच ही जमीन मिळावी असा आमचा प्रयत्न आहे, असं केपी मधू यांनी सांगितलं. राहुल गांधी यांना घर बनवण्यासाठी वायनाड ही एक आदर्श जागा आहे. कारण सुट्टी घालवण्यासाठी ते इथे येत आहेत, असंही मधू यांनी म्हटलंय.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांनी रायपूरच्या काँग्रेस अधिवेशनला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी गेल्या 52 वर्षात माझ्याकडे घर नसल्याचं म्हटलं होतं. अलाबादपासून काश्मीरपर्यंत आमच्याकडे घर नाहीये, असं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी ते सहा वर्षाचे असतानाच्या एका घटनेचा उल्लेख केला होता. तेव्हा घरात एक वेगळं वातावरण होतं. मी आईकडे गेलो. तिला विचारलं काय झालं? आम्ही घरातून बाहेर पडत आहोत, असं आईने सांगितलं.

त्यावेळी मला माहीत नव्हतं की हे आमचं स्वत:चं घर नाहीये. मला वाटायचं हे आमचंच घर आहे. त्यामुळे मी आईला विचारलं आपण घर का सोडत आहोत. त्यावेळी मला आईने पहिल्यांदा सांगितलं की, आपल्याकडे घर नाहीये. हे सरकारचं घर आहे. सरकारचं घर असल्याने ते आपल्यालासोडावं लागत आहे, असं ते म्हणाले.

ते घर माझं नाहीये

त्यानंतर मी आईला विचारलं आता आपण कुठे जाणार आहो? त्यावर मला माहीत नाही, असं आई म्हणाली. आईचे हे उद्गार ऐकून मी हैराण जालो. मला वाटायचं हे आमचं घर आहे. अलहाबादमध्ये आमचं वडिलोपर्जित घर आहे. पण ते आमचं नाहीये. मी ज्या 12 तुघल लेनवर राहतो. ते घरही माझं नाहीये, असं ते म्हणाले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.