वायनाडमध्ये प्रियंका गांधीला भाजपची इंजिनिअर असलेली महिला उमेदवार देणार लढत

navya haridas vs priyanka gandhi: विधानसभा निवडणुकीत इंडियन नॅशनल लीगचे अहमद देवरकोविल यांना इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नूरबीना राशिद यांनी पराभूत केले होते. अहमद दवरकोविल यांना 52,557 मते मिळाली होती. नाव्या यांना 24,873 मते मिळाली होती.

वायनाडमध्ये प्रियंका गांधीला भाजपची इंजिनिअर असलेली महिला उमेदवार देणार लढत
Priyanka Gandhi, Navya Haridas
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 9:24 PM

Wayanad Lok Sabha bypoll: भारतीय जनता पक्षाने 24 विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरणाऱ्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विरोधात इंजिनिअर असलेला चेहरा भाजपने दिला आहे. भाजपकडून केरळमधील वायनाड मतदार संघातून नाव्या हरिदास मैदानात उतरणार आहे. राहुल गांधी यांनी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रियंका गांधी प्रथमच सक्रीय राजकारणात एन्ट्री करत आहे.

यामुळे होत आहे निवडणूक

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर राहुल गांधी यांना विजय मिळाल्यामुळे वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आहेत. भाजपने महिला उमेदवाराविरोधात महिला उमेदवारच देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजपच्या उमेदवार असलेल्या नाव्या हरिदास कोण आहे…

नाव्या मॅकेनिकल इंजिनिअर

नाव्या हरिदास 39 वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्यांचे पती शोभीन श्याम आहे. नाव्या यांनी केएमसीटी इंजिनियरिंग कॉलेजमधून 2007 मध्ये बी.टेक केले. त्या भाजप महिला मोर्चाचे राज्य महासचिव आहेत. नाव्या 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरल्या होत्या. परंतु त्यांचा पराभव झाला होता. 2021 मध्ये कोझीकोड दक्षिण विधानसभा मतदार संघातून लढताना त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणुकीत इंडियन नॅशनल लीगचे अहमद देवरकोविल यांना इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नूरबीना राशिद यांनी पराभूत केले होते. अहमद दवरकोविल यांना 52,557 मते मिळाली होती. नाव्या यांना 24,873 मते मिळाली होती. वायनाड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Non Stop LIVE Update
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.