कोणीही दिशाभूल करायला, आम्ही काय लहान मुलं नव्हे; ओवेसींचे मोहन भागवतांना चोख प्रत्युत्तर

CAA कायद्यामुळे देशाला कोणताही धोका नाही. यावरुन मुस्लीम समाजात जाणीवपूर्वक संभ्रम पसरवला जात असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. | Asaduddin Owaisi

कोणीही दिशाभूल करायला, आम्ही काय लहान मुलं नव्हे; ओवेसींचे मोहन भागवतांना चोख प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 6:09 PM

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) देशातील मुस्लीम समाजामध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. परंतु, कोणीही दिशाभूल करायला आम्ही काही लहान मुलं नव्हे, अशी शब्दांत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली. (Asaduddin Owaisi hits back Mohan Bhagwat)

दसऱ्यानिमित्त नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी CAA कायद्यासंदर्भात भाष्य केले होते. CAA कायद्यामुळे देशाला कोणताही धोका नाही. यावरुन मुस्लीम समाजात जाणीवपूर्वक संभ्रम पसरवला जात असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.

सरसंघचालकांच्या या वक्तव्याचा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. कोणीही दिशाभूल करायला आम्ही काही लहान मुले नाही. CAA आणि NRC या कायद्यांचा अर्थ भाजपने अजून स्पष्ट केलेला नाही. हे कायदे केवळ मुस्लिमांसाठी नसतील तर त्यामधून धर्माचा उल्लेख का हटवला जात नाही? या कायद्यात स्वत:चे राष्ट्रीयत्त्व सिद्ध करण्याची अट राहील, तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू. धर्माच्या आधारावर राष्ट्रीयत्त्व ठरवणाऱ्या प्रत्येक कायद्याला आमचा विरोध असेल, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.

मला राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायचंय की, आंदोलनावेळी तुम्ही बाळगलेलं मौन आम्ही विसरलेलो नाही. भाजपचे नेते सीमांचलच्या लोकांना घुसखोर म्हणत असताना राजद व काँग्रेसने तोंडातून चकार शब्द न काढल्याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर दिल्लीत हिंसाचार उफाळला होता. शाहीन बागेसह दिल्लीच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाले होती. यापैकी काही आंदोलनांनी हिंसक वळण घेतल्याने दिल्लीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या शाहीन बागेत १०० दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरु होते.

संबंधित बातम्या:

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय – भागवत

आंदोलक अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवू शकत नाहीत: सर्वोच्च न्यायालय

(Asaduddin Owaisi hits back Mohan Bhagwat)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.