Bageshwar Baba : ‘तुझे दिवस भरले, आम्ही इंदिराला नाही सोडलं, आता तुझी वेळ…’, भर मचांवरुन बागेश्वर बाबांना धमकी
Bageshwar Baba : हिंदू समाजाला एकजूट करण्यासाठी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची यात्रा सुरु आहे. या दरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. "मी सांगतो, ये पण एक गोष्ट लक्षात ठेवं, आम्ही इंदिरा गांधीला नाही सोडलं. बाबा नोट करं, तुझे दिवस भरले" अशा शब्दात ही भर मंचावरुन ही धमकी देण्यात आली आहे.
हिंदू समाजाला एकजूट करण्यासाठी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 9 दिवसीय पदयात्रा काढली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पंजाबमधील शिख कट्टरपंथीय नेता बरजिंदर परवाना यांनी बागेश्वर बाबांना ही धमकी दिलीय. यानंतर परवाना विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. बरजिंदर परवानाने स्टेजवरुन धमकी दिली. ‘बाबा नोट करं, तुझे दिवस भरले. तुलाही मारुन टाकणार’ असं परवाना म्हणाला. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वक्तव्यावरुन त्याला ही धमकी देण्यात आलीय. बरजिंदर परवानाचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
“बागेश्वर धामचा एक साधू म्हणतो, प्रत्येक मंदिरात तो पूजा आणि अभिषेक करणार. मी सांगतो, ये पण एक गोष्ट लक्षात ठेवं, आम्ही इंदिरा गांधीला नाही सोडलं. बाबा नोट करं, तुझे दिवस भरले” असं बरजिंदर परवाना या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय. “प्रत्येक मंदिर तर लांब, अमृतसरला येऊन दाखवं. तू ये तर खरं…तुला पण मारुन टाकणार” अशी धमकी दिली.
हे विधान गोल्डन टेम्पलसाठी असल्याचा समज झाला
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वक्तव्यावरुन कंफ्यूजन निर्माण झालय, त्यावरुन हा सर्व वाद निर्माण झालाय. धीरेंद्र शास्त्री यांनी 18 मार्चला मुरादाबादमध्ये एक वक्तव्य केलं होतं, “हरिहर मंदिरात रुद्राभिषेक झाला पाहिजे. आता लवकरात लवकर त्या मंदिरात पूजा सुरु झाली पाहिजे” धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं हे वक्तव्य संभलच्या हरिहर मंदिराबद्दल होतं. पंजाबच्या सुवर्ण मंदिराशी त्याचा संबंध नव्हता. शिख कट्टरपंथीय नेता बरजिंदर परवानाने हे विधान गोल्डन टेम्पलसाठी असल्याचा समज करुन घेतला.
मोठ्या विरोध प्रदर्शनाचा इशारा
शिख नेत्याच्या या धमकी विरोधात शिवसेना पंजाबचे अवतार मौर्य, पंजाब यूथ प्रधान अजय गुप्ता आणि जिल्हा प्रवासी सेल प्रधान सोहनलाल एसएसपी खन्ना हे अश्विनी गोत्याल यांना भेटले व धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रार नोंदवली. त्यांनी बरजिंदर परवानावर पंजाबमधील वातावरण खराब करण्याचाही आरोप केला. अँटी टेररिस्ट फ्रंट इंडिया आणि विश्व हिंदू तख्तचे प्रमुख वीरेश शांडिल्य यांनी 48 तासांच्या आत शीख कट्टरपंथीय बरजिंदर परवानाच्या अटकेची मागणी केली आहे. अटक न केल्यास मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करणार असल्याच म्हटलं आहे.