Rahul Gandhi : ‘काँग्रेस 50 टक्के आरक्षणाची मर्यादा…’, राहुल गांधींच महत्त्वाच वक्तव्य

Rahul Gandhi : "आम्ही जातिनिहाय जनगणनेवर बोललो, तर भाजप आणि संघ विरोध करतो. एक्सरे काढण्याला अडचण काय? तुम्हाला अडचण काय? त्यांचा विरोध यासाठी आहे की त्यांना सत्य लपवायचं आहे. देशातील 90 टक्के लोकांना देशाची संपत्ती, सिस्टिम कुणाच्या किती हातात आहे हे लोकांना कळू नये असं त्यांना वाटतं" असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : 'काँग्रेस 50 टक्के आरक्षणाची मर्यादा...',  राहुल गांधींच   महत्त्वाच वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 2:15 PM

“90 आयएएस ऑफिसर बजेट तयार करतात. त्यात तीन ओबीसी आहेत. त्यात तीन दलित आणि एक आदिवासी आहे. तुमची लोकसंख्या 50 टक्के आहे, ओबीसी हिंदुस्थानात 100 रुपये खर्च करतो तर 5 रुपयांचा निर्णय ओबीसी अधिकारी घेत आहेत. लोकसंख्या ओबीसींची 50 टक्के आहे. दलित 15 टक्के आहेत. पण 100 रुपयातून एक रुपयाचा निर्णय घेतात. आदिवासी 8 टक्के आहेत, ते 100 रुपयांमधील 10 पैशाचा निर्णय घेतात” असं राहुल गांधी म्हणाले. “त्यामुळे दोन गोष्टी स्पष्ट आहेत. पहिल्यांदा आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काँग्रेस आणि इंडिया आघाडी बदलणार. आम्ही अशी आश्वासन देत नाही. आम्ही जे बोलतो ते करतोच” असं राहुल गांधी म्हणाले.

“दुसरा उपाय, त्याला मी क्रांतिकारी उपाय समजतो. ते म्हणजे जातीनिहाय जनगणना. देशात ओबीसी किती आहे, हे कुणाला माहीत नाही. लिगली कुणाला माहीत नाही. जातीगणनेनंतर अधिकृत माहिती मिळेल. जातीनिहाय जनगणनेची गोष्ट करतो तेव्हा दोन गोष्टी जोडतो. कुणाची किती लोकसंख्या आणि या वेगवेगळ्या वर्गाचा भारताच्या आर्थिक सिस्टिममध्ये किती पकड आहे. यांच्या हातात किती पैसा आहे. दलितांच्या हातात किती पैसा आहे, आदिवासींच्या हातात किती पैसा आहे. ओबीसींच्या हातात किती पैसा आहे. सोशो इकोनॉमिक सर्व्हे. त्याही पेक्षा महत्त्वाचं हिंदुस्थानच्या संस्थेत हा वर्ग किती आहे. कोणत्या लेव्हलला आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

‘त्याचा आम्ही एक्सरे करणार’

“मीडिया, न्यायालय, नोकरशाहीत किती दलित, ओबीसी आदिवासी आहेत. कोण किती बजेट सांभाळत आहे. एखाद्याला मार लागला आणि डॉक्टरांनी एक्सरे करायला सांगितलं तर आपण करतो. जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे आहे. आम्हाला माहीत आहे की मार लागलाय. पण मार किती लागलाय माहीत नाही. नेमकं काय होतंय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्याचा आम्ही एक्सरे करणार आहोत” असं राहुल गांधी म्हणाले.

एक्सरे काढण्याला अडचण काय?

“आम्ही जातिनिहाय जनगणनेवर बोललो, तर भाजप आणि संघ विरोध करतो. एक्सरे काढण्याला अडचण काय? तुम्हाला अडचण काय? त्यांचा विरोध यासाठी आहे की त्यांना सत्य लपवायचं आहे. देशातील 90 टक्के लोकांना देशाची संपत्ती, सिस्टिम कुणाच्या किती हातात आहे हे लोकांना कळू नये असं त्यांना वाटतं” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘मोदी असो की भाजप कोणीही रोखू शकणार नाही’

“जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणारच. राज्य सभा आणि लोकसभेत मंजूर करून घेणार. आम्ही कायदा करणार. मोदी असो की भाजप कोणीही रोखू शकणार नाही. या दोन गोष्टी केल्यावरच खरं राजकारण सुरू होईल. जातीनिहाय जनगणना सुरू झाली तर सर्व डेटा आपल्या हाती असेल” असं राहुल गांधी म्हणाले.

‘मोदींना संविधान डोक्याला लावावं लागलं’

“भाजप आणि संघाने सर्व रस्ते बंद केले आहेत. आपल्याला रस्ते उघडायचे आहेत. संविधानाचं संरक्षण करायचं आहे. संविधान गेलं तर सर्व गेलं. मोदी आधी 400 पार म्हणत होते. हसत होते. 56 इंचाची छाती होती. मोदींनी संविधान डोक्याला लावलं ते सर्वांना आवडलं. पण त्यांना डोक्याला लावावं लागलं. ते संविधान मानत नाही. जनतेच्या शक्तीपुढे ते झुकले” असं राहुल गांधी म्हणाले.

'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.