AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा

महागठबंधनच्या सर्व उमेदवारांनी  जिंकल्यानंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच केंद्रातून बाहेर निघावे. | bihar election results 2020

Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 2:50 PM

पाटणा: बिहारमध्ये महागठबंधनचीच सत्ता येईल, आणखी थोडा वेळ वाट पाहा, असा छातीठोक दावा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार मनोज झा यांनी केला आहे. आम्ही जे बोललोय ते खरे करून दाखवू. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे मनोज झा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच महागठबंधनच्या सर्व उमेदवारांनी  जिंकल्यानंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच केंद्रातून बाहेर निघावे. अन्यथा नंतर काहीही घडू शकते. मतमोजणी संथपणे का सुरु आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मात्र, महागठबंधनचा विजय निश्चित आहे, असे मनोज झा यांनी सांगितले. (RJD MP Manoj Jha says Mahagathbandhan will get majority vote)

आज सकाळीच मनोज झा यांनी महागठबंधन बिहारची निवडणूक एकतर्फी जिंकेल, असा दावा केला होता. बिहारमध्ये अटीतटीची लढत होत नाही, येथील जनता एकतर्फीच निकाल देते, असे झा यांनी म्हटले होते. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांनंतर महागठबंधनकडे असणारी आघाडी कमी होत गेली. त्यामुळे नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार, या आशेने जदयूच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती.

मात्र, दरम्यानच्या काळात मतमोजणीचा वेग कमालीचा संथ असल्याचे दिसून आले. अखेर यावर निवडणूक आयोगाला पत्रकारपरिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. यंदा कोरोनामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त 20 टक्केच मतमोजणी झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

त्यामुळे निराशेचे वातावरण पसरलेल्या महागठबंधनच्या गोटातील आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज झा यांनी आता पुन्हा एकदा ‘राजद’च्या विजयाचा दावा करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी काही तासांनंतर निकालाचे चित्र वेगळे असेल, असा दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या:

Bihar election: बिहारचा खरा निकाल अजून लागायचाय, 3 कोटी मतांची मोजणी बाकीच, अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय

(RJD MP Manoj Jha says Mahagathbandhan will get majority vote)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.