15 हजार मुस्लिमांच्या हातात दिली होती हत्यारे, देशात दहशतवादी कृत्य करण्याचा होता कट, संशयित दहशतवाद्यांनी केला पीएफआयच्या प्लॅनचा भांडाफोड
तरुणांना हत्यारांचे प्रशिक्षण देण्यासाठी बिहार राज्यात 15 जिल्ह्यांत कँप ऑफिस उघडण्यात आले होते. त्याचे हेडक्वार्टर पूर्णियात ठेवण्यात आले होते. हे दोघेही पीएफआयशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गरजेप्रमाणे त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
पटना- बिहारमधील बेरोजगार मुस्लिमांना (Bihar Muslims)पैशांचे आमिष दाखवून, देशात दहशतवादी कृत्ये (Terrorist act)घडवण्याचा कट शिजत होता. यासाठी बिहार राज्यातील 15 हजारांहून अधिक तरुणांना हत्यारे (training)चालवण्याचे ट्रेनिंग दिले गेले होते. देशविरोधी मोहीम चालवण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी अतहर परवेज आणि अरमान मलिक यांनी या धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी प्रॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(PFI)शी संबंधित अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. तरुणांना हत्यारांचे प्रशिक्षण देण्यासाठी बिहार राज्यात 15 जिल्ह्यांत कँप ऑफिस उघडण्यात आले होते. त्याचे हेडक्वार्टर पूर्णियात ठेवण्यात आले होते. हे दोघेही पीएफआयशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गरजेप्रमाणे त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
गावातील मुलांना व्हॉट्सएपद्वारे जोडत होते
पीएफआयचे सदस्य गावांमध्ये फिरत. अनेक रस्त्यांवर फिरताना ते अशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना हेरत असत. यातील बरेचशे तरुण हे सरकारी व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत, त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. या हेरलेल्या तरुणांना थोडीबहुत आर्थिक मदत करण्यात येत असे. मग त्यांचे ब्रेनवॉश करण्यात येई. अशिक्षित तरुण यानंतर यांच्या गळाला लागत असत. त्यानंतर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जोडण्यात येत असे. हळूहळू त्यांना धर्माच्या नावाने भडकवण्यात येत असे. त्यानंतर हे तरुण हत्यारांच्या ट्रेनिंगसाठी तयार होत. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना काय करण्यास सांगण्यात येत असे, याची माहिती मात्र अद्याप पुढे येऊ शकलेली नाही.
ट्रेनिंग झालेल्या 10 जिल्ह्यांची नावे आली समोर
ज्या 15 जिल्ह्यांत पीएफआयने या तरुणांना प्रशिक्षित केले होते, त्यापैकी 10 जिल्ह्यांची नावे समोर आली आहेत. यात पटना, नालंदा, पूर्व चंपारण्य, दरभंगा, मधुबनी, कटिहार, अररिया, वैशाली, मुज्जफरपूर आणि सारण या जिल्ह्यांचा समावेश आहे. पटणा पोलिसांनी 11 जुलै रोजी अतहर परवेज आणि जलालुद्दीन यांना फुलवारी शरीफमधून अटक केले होते. मात्र 13 जुलैला हे जाहीर करण्यात आले. 14 जुलैला अरमान मलिक याला अटक करण्यात आली. अतहर आणि अरमान यांना 48 तासांच्या कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आलीये.
अतहर आणि अरमान यांची वेगवेगळी चौकशी
सुरुवातीला या दोघांचीही वेगवेगळी चौकशी करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जेव्हा त्यांचे जबाब वेगवेगळे नोंदवण्यात आले त्यानंतर त्यांची पुन्हा एकत्र चौकशी करण्यात आली. असे आत्तापर्यंत अनेकदा करण्यात आले आहे. या दोघांनी चौकशीत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही अनेकवेळा केला.
पूर्णिया हेडक्वार्टरमध्ये मिळाले रजिस्टर
हे दोघेही चौकशीत फारसे सहकार्य करत नव्हते. पूर्णिया हेडक्वार्टरची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापेमारी केली. तिथे नेहमी येणारे लोक फरार झाले होते. या ठिकाणाहून एक रजिस्टर पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात तिथे आलेल्या प्रत्येकाचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता होता. त्यानंतर पोलिसांनी या आधारावर चौकशी केली.
पीएफआयच्या फंडिंग कनेक्शनचीही होणार चौकशी
या पीएफआयला कुठून पैसा येत होता याचीही आता चौकशी करण्यात येते आहे. पीएफआयच्या बँक अकाऊंटमधून 90 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. हवालातून हे फंडिंग होत असावे असा संशय आहे. आता बँकेतूनही या सगळ्याची चौकशी करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.