Weather Alert : राज्यासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे, भयंकर वाढेल उन्हाळा; वाचा वेदर रिपोर्ट
हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कडाक्याचा उन्हाळा असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा सहन करण्यासाठी तयार रहा. कारण, हवामान खात्याने येत्या 3 महिन्यांचा भयंकर गरमी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे. हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कडाक्याचा उन्हाळा असल्याची माहिती देण्यात आली आहे. (weather alert for summer in maharashtra indias minimum and maximum temperatures are expected to be above normal in many states)
राज्यात गरमी करणार हैराण
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा जास्तीत जास्त तापमान सामान्यपेक्षा विशेषत: उत्तर पश्चिम भारत म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व ईशान्य भारतातील काही भाग म्हणजे बिहार, बंगाल, झारखंड इथं अधिक राहील. अशात मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हवामान गरम असू शकतं.
गोवाही तापणार…
गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड आणि ओडिशामध्येही या वेळी जास्तीत जास्त तापमान नेहमीच्या वर जाईल. त्याशिवाय कोकण गोवा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. इतकंच नाहीतर इतर राज्यांत तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी असेल.
2006 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता
आनंद शर्मा पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा खूपच जास्त होतं. 2006 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवत आहे. ते म्हणाले की, प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे हिवाळाही जास्त होता. परंतु आता त्याचा परिणाम कमी होताना दिसत आहे. यामुळे उष्णता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. (weather alert for summer in maharashtra indias minimum and maximum temperatures are expected to be above normal in many states)
संबंधित बातम्या –
कांजूरमार्ग कारशेड डेपो उभारण्यासाठी राज्य सरकारची तत्वतः मान्यता
चित्रा वाघ रश्मी करंदीकर यांच्या भेटीला, फोटो मॉर्फ प्रकरणी तक्रार
मोठे नेते नसतानाही शेतकऱ्यांची आंदोलनस्थळी गर्दी कायम, काय आहे गाझीपूर बॉर्डरवरील ‘रोटेशन’ पद्धत?
नॅशनल हायवेवर जेवढं अंतर प्रवास कराल तेवढाच टोल टॅक्स द्यावा लागणार!, काय आहे गडकरींचा प्लॅन?
(weather alert for summer in maharashtra indias minimum and maximum temperatures are expected to be above normal in many states)