Weather Alert : दिल्लीसह देशभरात थंडीचा कहर, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

नवी दिल्ली : दिल्लीतील तापमानाचा पारा वारंवार घसरताना दिसत आहे. दिल्ली सध्या शीतलहरीच्या चक्रात असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर महिन्याच्या अखेरीस दिल्लीत तापमान 2 अंशापर्यंत जाईल असाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. डोंगराळ भागामध्ये जोरदार हिमवृष्टीने झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात […]

Weather Alert : दिल्लीसह देशभरात थंडीचा कहर, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 10:03 AM

नवी दिल्ली : दिल्लीतील तापमानाचा पारा वारंवार घसरताना दिसत आहे. दिल्ली सध्या शीतलहरीच्या चक्रात असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर महिन्याच्या अखेरीस दिल्लीत तापमान 2 अंशापर्यंत जाईल असाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. डोंगराळ भागामध्ये जोरदार हिमवृष्टीने झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात थंडीमुळे पारा 3 अंशांवर घसरला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण उत्तर भारताला शीतलहरीचा धोका असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. (weather alert news 18 december 2020 updates cold weather delhi minimum temperature)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दिल्लीत तापमान 3 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलं आहे. सतत घसरत्या तापमानामुळे आणि शीतलहरींमुळे येत्या काही दिवसांसाठी हवामान खात्याकडून दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आज किमान तापमान 3.5 अंश नोंदले गेले आहे. दिल्लीत या हंगामातील हे सर्वात कमी तापमान होतं. यासोबतच हवामानाने 10 वर्षांचा विक्रमही मोडला. याआधी 2011 मध्ये 16 डिसेंबर रोजी किमान तापमान 5 अंश होते.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

हवामान खात्याच्या इशार्‍याने दिल्लीतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिल्लीमध्ये थंडीचा तडाखा भीषण असणार, असा इशारा विभागाने दिला आहे. शुक्रवारीही दिल्लीत कडाक्याची थंडी आणि शीतलहरी कायम असतील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात केलांग, मनाली आणि कल्पामध्ये 24 तासांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे. इथे तापमान शून्यपेक्षा खाली नोंदले गेले आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगराळ राज्यात हवामान कोरडे असेल, परंतु किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली आहे.

पंजाब आणि हरियाणामध्ये शीतलहरींना सुरुवात झाली असून गुरुवारी पारा चांगलाच घसरला होता. दोन्ही राज्यांच्या राजधानीत किमान तापमान 5.1 डिग्री सेल्सियस होतं. हरियाणामधील अंबाला, हिसार, करनाल, भिवानी, रोहतक आणि सिरसा इथं किमान तापमान अनुक्रमे 4.4 डिग्री, 4.2 डिग्री, 4.9 डिग्री, 4.8 डिग्री, 4.4 डिग्री आणि 4.8 डिग्री सेल्सियस इतकं होतं. त्याचबरोबर पंजाबच्या अमृतसरमध्ये किमान तापमान 4.2 डिग्री आणि लुधियानामध्ये 5.5 डिग्री नोंदलं गेलं. येत्या दोन दिवसांत दोन्ही राज्यातील थंडी आणखी वाढेन असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रही गारठला

मुंबईसह, पुण्यात थंढीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे हवेतीला गारवा आणखी वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, आता शहरात किमान तापमानात हळूहळू घट व्हायला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या दोन दिवसांत थंडीचा पारा आणखी वाढेन असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

खरंतर, मागच्या आठवड्यात राज्यभर पाऊस झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पहाटे दाट धुकं पडल्याचं पाहायला मिळालं. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यासह, विदर्भातील अनेक भागांत गारठा वाढणार आहे. गुरुवारी (ता. 17) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी इथं 14.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. (weather alert news 18 december 2020 updates cold weather delhi minimum temperature)

इतर बातम्या –

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

Nagpur | नागपूरसह विदर्भात वाढणार थंडी, हवामान खात्याचा अंदाज

(weather alert news 18 december 2020 updates cold weather delhi minimum temperature)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.