Weather Alert : दिल्लीमध्ये थंडीनं मोडला रेकॉर्ड, हवामान खात्याकडून ‘या’ तारखेपर्यंत अलर्ट जारी

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात अनेक डोंगराळ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक राज्यांमध्ये थंडीचा पारा वाढत आहे.

Weather Alert : दिल्लीमध्ये थंडीनं मोडला रेकॉर्ड, हवामान खात्याकडून 'या' तारखेपर्यंत अलर्ट जारी
दिल्लीत आज सकाळी दाट धुरके पसरले होते. हे दृश्य दिल्लीतल्या जीटी करनाल रोडचे आहे. हवामान खात्याने (आयएमडी) राजधानी दिल्लीत आज दिवसभर 'मध्यम धुरकं' असेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 2:26 PM

नवी दिल्ली : उत्तर भारतातील बऱ्याच शहरांमध्ये शीतलहरींचा (Cold Wave) तडाखा पाहायला मिळत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये तर किमान तापमान (Minimum Temperature) 4 अशं डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. या तापमानाने आतापर्यंतचे थंडीचे सर्व विक्रम मोडले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात अनेक डोंगराळ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक राज्यांमध्ये थंडीचा पारा वाढत आहे. (weather update india forecast delhi minimum temperature today 19 december 2020 weather alert imd update)

अधिक माहितीनुसार, उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये सरासरी किमान तापमान 5 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं गेलं आहे. तापमानात घट झाल्यानं सर्दी आणि हिवाळी संसर्गाचा धोका वाढत असल्याचं समोर आलं आहे. खरंतर, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. हवामान विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, डोंगराळ भागात आणि पर्वतरांगावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होईल तेवढा थंडीचा कहर वाढेल. यामुळे नागरिकांनी सुरक्षा घेत आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी किमान तापमान 4 अंशावर होतं. या तापमानाने तब्बल 10 वर्षांचा विक्रमही मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, याआधी 2011 मध्ये 16 डिसेंबरला किमान तापमान 5 अंशांवर गेलं होतं. इतकंच नाही तर डिसेंबरच्या अखेरपर्यंत दिल्लीमध्ये किमान तापमान 2 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

एक आठवडा थंडी राहील कायम

पुढच्या आठवड्यापर्यंत थंडीचा कहर असाच सुरू राहिल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर यानंतर तापमान सामान्य होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, पुढच्या आठवड्यात उत्तर भारतात तापमान सामान्यपेक्षा खाली असू शकतं. विभागाने 17 ते 24 डिसेंबर आणि 24 ते 30 डिसेंबर या कालावधीत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्वेकडील बहुतेक भागात किमान तापमान साधारणपेक्षा 2-6 डिग्री सेल्सियस राहील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात शीतलहरी

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये शीतलहरी वाढतील. तर दिल्लीमध्येही काही भागात किमान तापमान तीन अंशांवर पोहोचले आहे. दरम्यान, या वाढत्या थंडीमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. एकीकडे थंडी आणि दुसरीकडे कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे गरम कपडे वापरणं आणि बाहेर जाताना मास्कचा वापर करणं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (weather update india forecast delhi minimum temperature today 19 december 2020 weather alert imd update)

संबंधित बातम्या – 

मुंबईसह महाराष्ट्र गारठणार? पुणेकरांसाठीही हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

(weather update india forecast delhi minimum temperature today 19 december 2020 weather alert imd update)

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.