नवरी रुसली, अन् बाई लगीन मोडून बसली… नवरोबाच्या घरच्यांचं ‘हे’ कृत्य भोवलं?
जेव्हा नवरी मुलगी त्यांच्या घरची सून होण्याआधी म्हणते, 'सस्ती चीजों शौक.......' कळलं ना तिला काय म्हणायचंय ते?
उत्तराखंड : लग्न (Indian Wedding) म्हटलं की लग्नाच्या तयारीची धामधूम काय असते, हे वेगळं सांगायला नकोच! अशातच लग्नात नवरा नवरीचा पोशाख हा तर सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. विशेष म्हणजे लग्नातील विधी (Wedding rituals) जितका महत्त्वाच्या तितकाच लग्नातील पोशाख कितीला घेतला, याची चर्चा महत्त्वाची. याची आठवण करुन देण्याचं कारण म्हणजे एका मुलीला तिच्या सासरकडच्यांनी स्वतःला पोशाख खरेदी केला म्हणून तिने चक्क लग्न मोडलंय. घटना उत्तराखंडमधील (Uttarakhand Wedding News) आहे. फक्त 10 हजार रुपयांचाच लहंगा का खरेदी केला, यामुळे नाराज झालेल्या मुलीने लग्न करण्यासच नकार दिलाय.
उत्तराखंड येथील हल्द्वानी येथे एका मुलीचा साखरपुडा झाला. तिचं लग्न 5 नोव्हेंबरला होणार होतं. पण नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलाकडच्यांनी पाठवलेला पोशाख अगदी स्वस्तातला असल्याचं वाटलं, म्हणून ती नाराज झाली.
नाराजी इतकी वाढली की तिने चक्क लग्न करण्यासच नकार दिला. मुलीच्या होणाऱ्या सासरकडच्या लोकांनी हा लहंगा लखनौ येथून 10 हजार रुपये देऊन खरेदी केली होती. रानीखेत येथील मुलाशी या मुलीचं लग्न होणार होतं. पण स्वस्तातल्या लहंग्यामुळे तिने लग्न मोडलं.
दरम्यान, स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यांनी तिला एटीएम कार्डही दिलं. तिला स्वतःच्या मर्जीचा लहंगा खरेदी करता यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. पण तरी मुलगी काही ऐकायला तयार नव्हती. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
पोलिसांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मुलीकडे आणि मुलाकडे दोन्हीही लोकं तासनतान भांडले. पत्रिका छापल्याचं कारणही मुलाकडच्यांनी दिलं. पण शब्दाला शब्द वाढतच गेला. शेवटी पोलिसांनी यावत एक अंतिम तोडगा काढला.
लग्न रद्द करण्याचा सल्ला पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना दिली आणि लग्न खरोखर रद्द करण्यात आलं. भांडण करुन एकमेकांशी नातं जोडण्यापेक्षा ते न जोडलेलंच बरं, असा सल्ला देत अखेर हे लग्न मोडण्यात आलं.