पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ममता दीदींच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. पण ममता बॅनर्जी या सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 4:44 PM

कोलकाता | 24 जानेवारी 2024 : देशातील धडाकेबाज महिला नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा आज अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारविरोधात ते झुंज देण्यासाठी रणनीती आखत आहेत. यासाठी त्या इंडिया आघाडीसोबतही जाण्यास तयार आहेत. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये तयारी सुरु आहे. तशीच तयारी ममता बॅनर्जी यांच्याकडूनही सुरु आहे. पण या दरम्यान आज एक अनपेक्षित घटना घडली. ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतची बैठक पार पडल्यानंतर ममता कोलकाताला परतत होत्या. यावेळी कारचा अचानक ब्रेक लागल्याने ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना SSKM रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. ममता यांना किरकोळ जखम लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

वर्धमानमध्ये बैठकीआधी ममता बॅनर्जी या एका सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होणार होत्या. तिथून त्या हेलिकॉप्टरने राजधानी कोलकाताला परतणार होत्या. पण वातावरण खराब असल्याने त्यांना हेलिकॉप्टरने न घेऊन जाता रस्ते मार्गाने कोलकाताला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचा ताफा कोलकाताच्या दिशेला वेगाने पुढे जात होता. याच दरम्यान अपघाताची घटना घडली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.