Mamata Banerjee : दोन विमानं समोरा समोर, अवघ्या 10 सेकंदाचा खेळ; पायलटच्या समयसूचकतेनं दुर्घटना टळली, ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विमान अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. दोन विमानं समोरासमोर आल्याननं अपघात झालाय. ममता बॅनर्जी यांच्या पायाला आणि पाठिला दुखापत झाल्याची माहिती आहे. प

Mamata Banerjee : दोन विमानं समोरा समोर, अवघ्या 10 सेकंदाचा खेळ; पायलटच्या समयसूचकतेनं दुर्घटना टळली, ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या
ममता बॅनर्जी Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:58 PM

हिरा ढाकणे,टीव्ही 9 मराठी, मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विमान अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. दोन विमानं समोरासमोर आल्याननं अपघात झालाय. ममता बॅनर्जी यांच्या छातीला आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या. उत्तर प्रदेशातील प्रचार संपवून परत येत असताना हा प्रकार घडला. विमानाच्या पायलटच्या समयसूचकतेनं मोठी दुर्घटना टळलीय. ममता बॅनर्जी यांच्या विमानाच्या पायलटनं विमान कमी उंचीवरुन वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळं दोन्ही विमानांची टक्कर टळली.  हे सर्व होत असताना ममता बॅनर्जी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या छातीला आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती कळतेय.

पायलटची समयसूचकता यशस्वी ठरली

विमानाची समोरासमोर टक्कर होणार होती. मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. बंगाल सरकारनं शनिवारी याबाबतचा अहवाल मागवला होता. ममता बॅनर्जी यांच्या पाठीला आणि छातीला विमानात दुखापत झाली होती. त्यानंतर बंगाल सरकारनं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून याबाबत अहवाल मागलेला. प्रचार संपवून ममता बॅनर्जी या उत्तर प्रदेशातून परतत होत्या. त्यावेळी त्यांच्या विमानाची दुसऱ्या विमानासोबतच समोरासमोर टक्कर होण्याची शक्यता होती. अवघ्या दहा सेकंदाच योग्य पावलं उचलली गेली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. पायलटच्या प्रसंगावधानामुळे ममता बॅनर्जी या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या पाठीला आणि छातीला दुखापत झाली असल्याचं त्यांनी विधानसभेत पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

विमान तातडीनं खाली उतरवलं

ममता बॅनर्जी दसॉल्ट फालकॉन 2000 या विमानातून प्रवास करत असतेवेळी हा प्रसंग घडला. हे 10.3 टनचं विमान असून पायलटला पकडून एकूण 19 जण या विमानातून एकावेळी प्रवास करु शकतात. दरम्यान, वैमानिकानं नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर हे विमान सुरक्षित उतरवलं. पण त्याआधी विमानांची समोरासमोर टक्कर रोखण्यसाठी पायलटला विमान तातडीनं खाली आणावं लागलं. त्यावेळी विमानात कंप जाणवले आणि त्यातच ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली.

ममता बॅनर्जी यांनी विमानात नेमकं काय घडलं याची माहिती सोमवारी दिली. पश्चिम बंगाल विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यापूर्वी विमान दुर्घटनेविषयी त्यांनी सांगितलं.

 इतर बातम्या:

काही चित्रपट यशस्वी होतात काही नाही, मी Box Office वर चालेल म्हणून चित्रपट बनवत नाही-Nagraj Manjule

‘कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील!’ निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना काळजी करण्याचा सल्ला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.