West Bengal: पीएम मोदींच्या जागी आता लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ममतांचा फोटो दिसणार

आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत. west bengal vaccination certificate cm mamata banerjee

West Bengal: पीएम मोदींच्या जागी आता लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ममतांचा फोटो दिसणार
cm Mamta Banarjee
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 6:20 PM

नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, परंतु आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत. (west bengal people age group of 18 to 44 years vaccination certificate picture of cm mamata banerjee)

बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतात. तसेच सर्व लोकांना मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सीएम ममता बॅनर्जी यांनी मुख्य मंदिरातील पुजार्‍यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत. आता तिसर्‍या टप्प्यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टीएमसीने पंतप्रधान मोदींच्या फोटोवर केली होती तक्रार

विधानसभा निवडणुकांदरम्यान टीएमसीने लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींच्या चित्राबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तृणमूलने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, कोविड 19 लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींचा फोटो असून, पश्चिम बंगाल आणि अन्य निवडणुकीच्या राज्यांमध्ये को-विन प्लॅटफॉर्मद्वारे मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

लोकांना मोफत लस देत आहे सरकार

पश्चिम बंगाल सरकार लोकांना मोफत लस देत आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, प्रत्येक लसीसाठी 600 ते 1200 रुपये खर्च केले जातात. 1.4 कोटी लोकांना लसी देण्यात आल्यात. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत तुम्ही पाहिले तर बंगालमध्ये 8 कोटी लोक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची लसीची मागणी पूर्ण करावी. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध औद्योगिक कक्षांना राज्य सरकारच्या आपत्ती विभागाला निधी द्यावा, अशी विनंती केली होती, राज्य सरकार त्यांना ही लस देईल.

संबंधित बातम्या

NIOS Class 12 Exam Cancelled: एनआईओएस बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?

west bengal people age group of 18 to 44 years vaccination certificate picture of cm mamata banerjee

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.