AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | भारतात कोरोनाचा शिरकाव, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

भारतात 6 रुग्णांना कोरोना व्हायरची लागण झाली. या पार्श्वभूमीवर दक्षतेचे काही उपाय सुचवले (Corona Virus Easy Remedy) आहेत.

Corona Virus | भारतात कोरोनाचा शिरकाव, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 9:32 PM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला (Corona Virus Easy Remedy) आहे. चीन व्यतिरिक्त जगभरातील इतर देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. इटलीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची अचानक वाढ होऊन 52 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे भारतातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

भारतात 6 रुग्णांना कोरोना व्हायरची लागण झाली. दिल्ली, तेलंगणा, राजस्थान, जयपूर या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आज (3 मार्च) दिवसभरात तीन रुग्णांची वाढ झाली. तर कोरोनाग्रस्त आणखी आठ संशयितांची तपासणी सुरु आहे.

कोरोना व्हायरसवर अद्यापही उपाय शोधला गेलेला नाही. त्यासाठी कोणत्याही अधिकृत उपचाराचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षतेचे काही उपाय सुचवले (Corona Virus Easy Remedy) आहेत.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

1. नियमित हात धुवा दिवसातून जास्तीत जास्त वेळा साबणाने नियमितपणे हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरतं.

2. सुरक्षित अंतर राखा आपल्या आसपासच्या लोकांमध्ये किमान 3 फूट अंतर ठेवा. विशेषतः ज्यांना सर्दी खोकला असेल अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

3. नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नका आपण अनेक वस्तूंना स्पर्श करीत असतो. ज्यामुळे आपल्या हातावर बॅक्टेरिया असतात. वारंवार नाक, तोंड, डोळ्यांना हात लावल्याने हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

4. शिंकताना रुमालाचा वापर करा शिंकल्यानंतर नाका-तोंडातून निघणाऱ्या तरल पदार्थांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे शिंकताना नाका-तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा.

5. सर्दी, ताप, खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका जर तुम्हाला ताप, सर्दी असेल किंवा श्वसनास त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. तसेच अशा वेळी घरातच थांबा.

6. मोबाईलची स्क्रीन स्वच्छ ठेवा आठवड्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात.

7. बाथरुम स्वच्छ ठेवा बाथरुमची स्वच्छता करताना शॉवर डेटॉलसारख्या औषधी द्रव्याने जरुर स्वच्छ करा. प्लास्टिकच्या पडद्यांचा वापर बाथरुममध्ये करु नका.

8. विमान प्रवासात घ्यावयाची काळजी विमान प्रवासात स्वच्छ हात धुतल्यानंतरच विमानसेवेच्या कर्मचाऱ्यांच्या हातून खाद्यपदार्थ घ्या. कारण विमान प्रवासात विमान कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते.

9. प्रवास सहसा टाळा कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी शक्यतो लांबवरचा प्रवास टाळा. त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे.

10. मास्क वापरा सर्दी, खोकला झाल्यास आपला संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी डॉक्टरी सल्ल्याने योग्य तेच मास्क वापरा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य मास्कचा, योग्य प्रकारे वापर (Corona Virus Easy Remedy) करा.

पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.