कुवेतमध्ये भारतीय लोकं काय काम करतात? किती असतो त्यांचा पगार?
कुवेतच्या आर्थिक विकासामध्ये भारतीय लोकांचं फार मोठं योगदान आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भारतीय लोक कुवेतमध्ये रोजगारासाठी जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर गेले आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’देऊन सन्मानित करण्यात आलं. यानिमित्तानं जाणून घेऊयात की कुवेतमध्ये किती भारतीय लोक काम करतात, कुवेतच्या आर्थिक विकासामध्ये तेथील भारतीय लोकांचं काय योगदान आहे?
कुवेतच्या आर्थिक विकासामध्ये भारतीय लोकांचं फार मोठं योगदान आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भारतीय लोक कुवेतमध्ये रोजगारासाठी जातात. कुवेतमधील हॉस्पिटलपासून ते तेलाच्या विहिरी आणि कारखांन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक काम करतात. कुवेतच्या एकूण मनुष्यबळाचा विचार केला तर इतर देशाच्या तुलनेत इथे सर्वाधिक भारतीय लोक काम करतात. कुवेतमध्ये सध्या स्थितीत एकूण दहा लाख लोक काम करतात. हा आकडा कुवेतच्या एकूण लोकसंख्येपैकी 21 टक्के इतका आहे.कुवेतमध्ये जेवढे कामगार आहेत, त्यातील तीस टक्के कामगार हे भारतीय आहेत.
कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक भारतीय?
कुवेतमध्ये जेवढे कामगार आहेत, त्यातील तब्बल तीस टक्के कामगार हे भारतीय आहेत. भारतीय लोकं कुवेतमध्ये विविध क्षेत्रात काम करतात.ज्यामध्ये विविध कारखाने, तेलाच्या विहिरी,पायाभूत सुविधा पुरवणारे प्रकल्प यांचा समावेश होतो. मात्र कुवेतमध्ये सर्वाधिक भारतीय हे आरोग्य क्षेत्रात काम करतात.तेथील आरोग्य क्षेत्रामध्ये भारतीय लोकांचं एवढं वचर्स्व आहे, की जर आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व भारतीय लोक एकाचवेळी भारतात परतले तर तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते.
किती पगार मिळतो?
कर्नाटक, तामिळनाडू, केरळ,आध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून सर्वाधिक लोक रोजगाराच्या शोधात कुवेतला जातात.मीडिया रिपोर्टनुसार भारतातून जे लोक कुवेतला गेले आहेत त्यातील अकुशल कामगारांना महिन्याला 100 कुवेती दीनार एवढा पगार दिला जातो. तर कुशल कामगारांना 170 ते 200 कुवेती दिनार एवढा पगार मिळतो. जे आरोग्या क्षेत्राशी संबंधित लोक आहेत, जसे की डॉक्टर, नर्स याचा पगार इतर कामगारांपेक्षा जास्त असतो.