What after Death?: मृत्यूनंतर काय होतं?, मरुन पुन्हा जिवंत झालेल्या माणसांचे काय आहेत अनुभव?
ज्या लोकांना हे प्रश्न विचारण्यात आले, ते वैद्यकीयदृष्ट्या मरुन पुन्हा जिवंत झाले होते. अशा व्यक्तींचे तीन टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले. पहिले ज्यांना काही काळ मेल्यानंतर काही जाणीवच झाली नाही. दुसरे जे काही काळ मेल्यानंतर इतर कुणाशीतरी बोलत होते. तर तिसरे असे होते की ज्यांना मेल्यानंतर कुठलातरी प्रकाश दिसला.
नवी दिल्ली – मेल्यानंतर आपल्यासोबत काय होतं, (what after death)हा एक असा प्रश्न आहे की, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक (researcher) आणि वैज्ञानिक (scientist)अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. या प्रश्नाचे उत्तर, भलेभले हुशार असणाऱ्या व्यक्तिंनाही मिळालेले नाही. मृत्यूनंतर माणसाचं काय होतं, हा प्रश्न त्यामुळेच अनेकांना आव्हानात्मक तर कित्येकांना भीतीदायकही वाटत असतो. Independent.co.uk या साईटनुसार काही काळापूर्वी रेडिट थ्रेडने काही व्यक्तींशी बोलून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांना हे प्रश्न विचारण्यात आले, ते वैद्यकीयदृष्ट्या मरुन पुन्हा जिवंत झाले होते. अशा व्यक्तींचे तीन टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले. पहिले ज्यांना काही काळ मेल्यानंतर काही जाणीवच झाली नाही. दुसरे जे काही काळ मेल्यानंतर इतर कुणाशीतरी बोलत होते. तर तिसरे असे होते की ज्यांना मेल्यानंतर कुठलातरी प्रकाश दिसला. एनआययू लैंगोन मेडिकल सेंटर या इंग्लंडमधील मेडिसिनच्या एसोसिएट प्रोफेसर डॉ. सॅम पारनिया यांनी कार्डियाक अरेस्ट आलेल्या रुग्णांचा शोध घेतला, त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्या रुग्णांपैकी ४० टक्के जणांना वैद्यकीयदृष्ट्या मेल्यानंतरही त्यांना काहीतरी अलर्टनेस जाणवत होता. त्यांनी त्याचा अनुभवही घेतला. त्यांची उत्तरे आश्चर्यचकित करायला लावणारी होती. हा मृत्यूचा अनुभव घेऊन आलेल्या काही जणांच्या उत्तरातून मेल्यानंतर काय होते,याचा अंदाज आपण लावू शकतो.
मृत्यू होऊन जिवंत झालेल्यांचे काही अनुभव
डोळ्यासमोर अंधार पसरला
एका व्यक्तीने सांगितले की- मी अंजिओग्राफी करवून घेत होतो. मशीनच्या स्क्रीनकडे बघत डॉक्टरांशी बोलत होतो. हळूहळू मशीनचा आवाज आणि अलार्म कमी कमी होत गेला. माझ्या आजूबाजूचे सगळे घाबरले होते. माझ्या डोळ्यासमोरचे जग नाहिसे झाले होते. माझ्या डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. त्यानंतर मला एतकेच आठवते की जेव्हा डोळे उघडले तेव्हा डॉक्टर कुणालातरी सांगत होते की, आम्ही त्याला वाचवले. तो क्षण अत्यंत आनंददायी होता.
छिद्रातून खाली जात होतो
दुसऱ्या एका व्यक्तिने सांगितले की – मी क्लासमध्ये परेझेंटेशन देत असताना अचनाक पडलो. मझा श्वास थांबला होता आणि रक्ताभिसरणही थांबले होते. मला असे जामवत होते की एका छिद्रतून मी खाली खाली जातो आहे. आणि माझे सहकारी माझ्यासाठी रडत आहेत. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी मृत्यूच्या दाढेतून परतलो होतो. त्यानंतरचे मला फारसे काही आठवत नाही. हेरॉईन घेतल्.यामुळे माझे ह्रद्य बंद पडले होते. जमू काही एखादे स्वप्न पाहावे असे मला वाटत होते.
प्रकाशाची भिंत समोर होती
एका व्यक्तीने सांगितले की – मी फेब्रुवारी २०१४ मध्ये एका कामाच्या मिटिंगमध्ये पडलो आणि त्यानंतर पाच मिनिटे माझा हार्ट रेट आणि नाडी बंद पडली होती. माझी शेवटी आठवण पडण्यापूर्वी एका तासापूर्वीची आणि पडल्यानंतर दोन दिवसांची आहे. म्हणजे प़डल्यानंतर दोन दिवस काय झाले याची मला काहीच माहिती नाही. मी मेडिकल रुपात कोमात गेलो होतो. सुमारे ४० सेकंद मी सर्व काही विसरलो होतो. त्यावेळी मला जे जाणवलं ते खूपच वेगळं होतं. जेव्हा मला एम्ब्युलन्समधून नेत होते, तेव्हाचं मला थोडसं आठवतंय. मी माझा मृतदेह एम्ब्युन्समध्ये पाहू शकत होतो. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर प्रचंड प्रकाशाची एक भिंत होती आणि मी त्या भिंतीच्या समोर उभा होतो. मी जिकडेही पाहत होतो तिकडे मला ती भिंतच दिसत होती. त्यानंतर मला आठवत नाही. पुढची आठवण माझी हॉस्पिटलमधील आहे. माझ्या आजूबाजूला भरपूर धुकं होतं. आणि तिथे मी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला पाहत होतो. त्याने माझ्याशी बोलणे सोडलेले होते. त्या धुक्यातून बाहेर येत त्याने सांगितले की तोही आत्तापर्यंत परत जाऊ शकलेला नाही. पण मी रज प्रयत्न केले तर मी पुन्हा धरतीवर जाऊ शकतो. त्यानंतर मी हार मानली नाही. आणि माझे शरीर ढकलून दिले, तेव्हा मला शुद्ध आली. शुद्धीत आल्यावर मला आईने सांगितले की मी तर मेलो होतो.