WITT 2024 : अमूल दूध का पितोय इंडिया?; हा आहे X फॅक्टर

डॉ. कूरियन यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. 2016 पासून हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर 1980 पर्यंत देशात दुधाची प्रचंड कमतरता होती. दुधाची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने ऑपरेशन फ्लड नावाने अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेमुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये मोठा बदल झाला. त्यामुळे दुधाची कमतरताही कमी झाली.

WITT 2024 : अमूल दूध का पितोय इंडिया?; हा आहे X फॅक्टर
Amul Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 5:45 PM

नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : अमूल दुधाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा डोळ्यासमोर एक छोटी मुलगी तरळते. अमूल गर्ल म्हणून ही मुलगी अजूनही लोकप्रिय आहे. खरं तर या अमूल गर्लची जाहिरात 1966 मध्ये आली. आज तिसऱ्या पिढीतही ही मुलगी अजूनही लोकफ्रिय आहे. त्याकाळी ‘अटर्ली बटर्ली अमूल’ अशी अमूलची टॅगलाईन होती. ही टॅग लाईन खूप प्रसिद्ध झाली होती. त्यापूर्वी प्युअरली द बेस्ट अशी टॅग लाईन होती. गावापासून शहरापर्यंत अमूलची लोकप्रियता विखुरलेली आहे.

दूध, दही, पनीर, चॉकलेट, लस्सी आणि इतर डेअरी प्रॉडक्टमध्ये अमूलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूधात वेगवेगळी व्हरायटी ठेवण्यात आली आहे. तुम्हाला हवं ते उत्पादन तुम्ही घेऊ शकता. दूध आणि डेअरी प्रॉडक्टमध्ये अमूलने लहान मुलांपासून तरुण आणि बुजुर्गांपर्यंत सर्वांची काळजी घेत आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या मंचावर अमूलचे एमडी जयेन मेहता आले तेव्हा त्यांनी अमूलच्या लोकप्रियतेचं रहस्य उलगडलं. इंडियातच नव्हे तर जगभरात अमूलने आपली ओळख निर्माण केली आहे, असं जयेन मेहता यांनी सांगितलं.

अशी झाली सुरुवात

14 डिसेंबर 1946 मध्ये गुजरातला सहकारी सोसायटीच्या रुपाने अमूलचं काम सुरू झालं. आज अमूलचा कारभार लाखो लीटर दूधापर्यंत गेला आहे. 250 लीटर दुधाची क्षमता ठेवून हा व्यवसाय सुरू झाला. आज 30 लाख लीटर दुधापेक्षा अधिक क्षमता अमूलची आहे. या कंपनीने लाखो लोकांना रोजगार दिला आहे. भारतात मिल्कमॅ म्हणून ओळखले जाणारे डॉ. वर्गिस कुरियन यांनी गुजरातमधील दोन गावात सदस्य बनवून डेअरी सहकारीता संघाची स्थापना केली. म्हशीच्या दुधाची पाऊडर तयार करणारे कूरियन हे जगातील पहिले व्यक्ती होते. यापूर्वी गायीच्या दुधाची पाऊडर बनवली जात होती. परंतु, कूरियन यांनी ही संपूर्ण प्रक्रियाच बदलली.

जेव्हा दुधाचा दुष्काळ पडला…

देशातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी कूरियन यांनी 1973 रोजी गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनची स्थापना केली. डॉ. कूरियन हे स्वत: या फेडरेशनचे 34 वर्ष अध्यक्ष होते. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर अमूल ब्रँडच्या नावाने दूध, दही आणि डालडा बाजारात आणला गेला. त्यानंतर त्यांचं कामही वाढलं. त्यामुळे त्यांनी इतर डेअरी प्रोडक्ट तयार करण्यास सुरुवात केली. देशात दुधाचा दुष्काळ असल्याचा तो काळ होता. तेव्हा कूरियन यांनी दूध उत्पादनाच्या कामासोबतच लोकांना आत्मनिर्भर करण्याचा पण केला होता. त्यांनी गावातील शेतकरी आणि महिलांना दुधाचं उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. तुम्ही दूध विकून आत्मनिर्भर होऊ शकता हे लोकांच्या मनात ठसवण्यात ते यशस्वी झाले आणि त्यानंतर दुधाचा व्यवसाय वाढला.

X फॅक्टरने कसे काम केले?

कोणतीही कंपनी आपलं उत्पादन आणि सेवांमध्ये काळानुसार बदल करत असते. काळानुसार बदलणाऱ्या कंपनीचं कधी पतन होत नाही. ग्राहकांच्या आवाक्यातील आयटम असेल, बेस्ट क्वॉलिटी प्रोडक्ट देण्याची तयारी असेल तरच ती कंपनी X फॅक्टरमध्ये आलीय असं मानलं जातं. अमूलने या सर्व गोष्टी केल्या. म्हणूनच आज घराघरात अमूलचे दूधच नाही तर मिठाई आणि आईसक्रीम आणि अमूलचे इतर पदार्थ पोहचले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.