WITT 2024 : आव्हाने… तरीही भारताची वाटचाल तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने : टीव्ही9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास
राजधानी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. देशविदेशातील नेते आज संवाद साधणार आहेत. तर बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही आपली भूमिका मांडणार आहेत. टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : चीनची क्षेत्रीय महत्त्वकांक्षा नियम- आधारीत जागतिक व्यवस्थेसाठी धोक्याची घंटी आहे. तब्बल तीन दशकापासून चीनने आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात कुंपण घातल्यानंतरही पश्चिमेकडील बाजारात वेगाने वाढ झाली आहे. भारतापुढेही अनेक आव्हाने आहेत. पण तरी सुद्धा तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. समुद्ध होण्यासाठी दुसऱ्यांना सोबत घेऊन चालण्याची गरज आहे. एक कुटुंब, एक पृथ्वी आणि एक भविष्य यावर आपण लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तसेच याच आदर्शाची जगालाही गरज आहे, असं टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितलं.
टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट थिंक्स इंडिया टुडेचं दिल्लीत आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी हा विश्वास व्यक्त केला. आज दिवसभर होणाऱ्ंया कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट, मालदीवचे माजी संरक्षण मंत्री मॅडम मारिया अहमद दीदी, इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन उपस्थित राहणार आहेत. बरुण दास यांनी या सर्वांचे आभार मानले. हे तिन्ही दिग्गज आज वेगवेगळ्या सेशनमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आजच्या समीटला संबोधित करणार आहेत.
अत्यंत वेगळा कार्यक्रम
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट, मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मॅडम मारिया अहमद दीदी, इस्रायलच्या राजदूत नाओर गिलोन यांचं बरुण दास यांनी स्वागत केलं. न्यूज9 ग्लोबल समीटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करणं माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे, असं बरुण दास यांनी सांगितलं. आज टीव्ही9च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचा दुसरा दिवस आहे. आमच्या या वार्षिक समीटचं हे दुसरं पर्व आहे. पण हा कार्यक्रम अत्यंत मोठा आहे. या कार्यक्रमाचे आर्किटेक्चर आणि फॉरमॅट अत्यंत वेगळा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
20 देशांचे तज्ज्ञ आणि नेते
आजच्या ग्लोबल समीटचा विषय “India: Poised for the Next Big Leap” एक चांगली संकल्पना आहे. आम्ही जगातील 20 हून अधिक देशातील अनेक नेते आणि तज्ज्ञांना त्यांचा दृष्टिकोण आणि अनुभव शेअर करण्यासाठी पाचारण केलं आहे. या एंटरप्राइजमध्ये आपला वेळ आणि ऊर्जा दिल्याबद्दल टीव्ही9 नेटवर्क तुमचे आभार मानत आहे, असंही ते म्हणाले.
भारत ग्लोबल इंटरेस्टचं केंद्र
दशकांपासून मोमेंटम आणि जिओ पॉलिटिकल मोमेंट दोन्हीही भारताच्या बाजूने आहेत. सध्या ग्लोबल डायनामिक्सचे दोन स्तंभ आहेत. त्यामुळे जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकोनॉमिक्सचा सहभाग आहे. दोन्हीही प्रकरणात भारत आता ग्लोबल इंटरेस्टचं केंद्र बनला आहे, असं मला एक निरीक्षक म्हणून वाटतं. आपल्या देशाला ग्लोबल साऊथचा नवा नेता म्हणून पाहिलं जातआहे. आपण केवळ वैश्विक शांतीच्या चॅम्पियनच्या रुपानेच नव्हे तर ग्लोबल इकॉनॉमीतही एक ब्राइट स्पॉटवर ताबा मिळवला आहे. आयएमएफनेही असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्था आपल्यासारख्याच आव्हानांचा सामना करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.