What India Thinks Today : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरुवात झाली; सरकारने अनेक योजना सुरू केल्या – पुरी

TV9 न्यूज नेटवर्कच्या वतीने 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संवाद साधला. यावेळी पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

What India Thinks Today : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरुवात झाली; सरकारने अनेक योजना सुरू केल्या - पुरी
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 5:25 PM

नवी दिल्ली : TV9 न्यूज नेटवर्कच्या वतीने ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today Global Summit) या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. आज या ग्लोबल समिटचा दुसरा दिवस आहे. राजकारण, क्रीडा, समाजकारण, संस्कृती, उद्योग, व्यापर अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या समिटमध्ये विचारमंथन चालू आहे. भारतासह जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती या ग्लोबस समिटमध्ये सहभागी झाले आहेत. टीव्ही 9 च्या या मंचावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) 2014 साली सत्तेवर आले आणि तेव्हापासूनच विकास कामांना सुरुवात झाली. केंद्राच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी सामान्य मानसांच्या जीवनात क्रांती आणली. त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजना यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. 2022 पर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाकडे त्याचे स्वत:चे घर असायला हवे असं मोदींनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्याकडून माहिती मागवण्यात आली होती. तेव्हा एक कोटी घराची गरज असल्याचे समोर आले होते. मात्र तुम्हाला हे ऐकूण आनंद होईल की केंद्र सरकारने एक कोटी 22 लाख घरांना मंजुरी दिल्याचे पुरी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

43 लाख फेरीवाल्यांना कर्ज

पुढे बोलताना पुरी यांनी म्हटले की, लोकांचे आरोग्य सुरक्षीत रहावे, त्यांना चांगले उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाख रुपयांची सुविधा देण्यात येत आहे. तसेच कोरोना काळात फेरीवाल्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली होती. व्यवसाय ठप्प असल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी दहा हजार कर्ज देण्याची योजना सुरू करून पुन्हा एकदा त्यांना उभारी देण्याचे काम केले. जवळपास 43 लाख अधिकृत फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतला. केंद्राने या सारख्या अनेक चांगल्या योजना जनतेच्या भल्यासाठी राबवल्या

अग्निपथ बाबत काय म्हणाले पुरी?

दरम्यान सध्या केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. या योजनेला होत असलेल्या विरोधावर देखील यावेळी पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक अग्निपथ बाबत संभ्रम निर्माण करत आहेत. केंद्र सरकारने मागे शेतकऱ्यांसाठी तीन नवे कृषी कायदे तयार केले होते. ते शेतकरी हिताचेच होते. मात्र तेव्हा देखील असाच संभ्रम पसरवण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत भरती होऊ शकली नाही. मात्र आता केंद्राने त्यासाठी खास अग्निपथ ही योजना तयारी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आपल्या देश सेवेचे स्वप्न पूर्ण करता येईल व त्याचा त्यांना योग्य मोबदला देखील मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.