What India Thinks Today : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’त प्रसिद्ध अभिनेत्री हजेरी लावणार; रवीनाचा होणार विशेष सन्मान

टीव्ही 9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समीट 2024' च्या दुसरा सिझन येत्या 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होत आहे. 25 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे संमेलनात भाग घेणार आहेत. 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीही उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी अभिनेत्री रवीना टंडन हिचा सत्कार करण्यात येणार आहे.

What India Thinks Today : 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'त प्रसिद्ध अभिनेत्री हजेरी लावणार; रवीनाचा होणार विशेष सन्मान
What India Thinks Today Global Summit 2024: Attendance of Sinestars; Raveena will be felicitated
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 8:53 PM

नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : भारताचं नंबर वन नेटवर्क टीव्ही 9 ने पुन्हा एकदा वार्षिक फ्लॅगशीप कॉन्क्लेव्ह ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’चं आयोजन केलं आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी हे महासंमेलन होत आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी या संमेलनाची सुरुवात होणार आहे. 27 फेब्रुवारी या संमेलनाचा समारोप होणार आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीही या समीटमध्ये भाग घेणार आहेत.

या कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मनोरंजन, खेळ, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सेशन होणार आहे. त्याचवेळी टीव्ही9च्या या महामंचावर बॉलिवूडच्या अभिनेत्री येणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी डार्लिंग्स आणि दिल्ली क्राईम सारख्या सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलेली अभिनेत्री शेफाली शाह भाग घेणार आहे.

रवीना टंडनला नक्षत्र सन्मान

25 फेब्रुवारी रोजी याच कॉन्क्लेव्हमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनचा सत्कार करण्यात येणार आहे. रवीनाला नक्षत्र सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे. शेफा्ली शाहलाही सन्मानित करण्यात येणार आहे. कंगना राणावत सुद्धा या कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेणार आहेत. कंगना या कार्यक्रमातील ग्लोबल समीटच्या सेशनमध्ये दिसणार आहे. यावेळी कंगना आपले विचार मांडणार आहे.

मोदीही भाग घेणार

25 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे संमेलनात भाग घेणार आहेत. 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्गदर्शन करणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट हे सुद्धा या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदीसहीत अनेक विदेशी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या परिसंवादात केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी सामील होणार आहेत. त्या ‘नारी शक्ती विकसित भारत’ या परिसंवादात भाग घेतील. या कॉन्क्लेव्हमध्ये स्टार्टअप इंडियावरही चर्चा होणार आहे. त्यात उद्योग क्षेत्रातून नीलेश शाह, जयेन मेहता, दीपेंदर गोयल, सुषमा कौशिक भाग घेणार आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.