WITT 2024 : अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशात शांतता; अभय भूतड़ा यांच्याकडून कौतुक

वैश्विक आर्थिक व्यासपीठावर आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारत मार्गक्रमण करत आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर भारत आहे, डीजिटल इंडियाची हाक देऊन भारताने देशात डीजिटल क्रांती घडवून आणली आहे. तसेच देशाचा विकासासाठी मानव केंद्रीत दृष्टीकोणच्या माध्यमातून डीजिटल रुपाने सशक्त समाज आणि ज्ञानाची अर्थव्यवस्थेत बदल केला आहे.

WITT 2024 : अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशात शांतता; अभय भूतड़ा यांच्याकडून कौतुक
abhay bhutada Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 7:34 PM

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वामुळेच देशात शांतता आहे. कोणत्याही देशातील नागरिकांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. त्या देशाची कायदा आणि सुव्यवस्था चांगली असणंही महत्त्वाचं असतं. ते काम अमित शाह यांनी केलं आहे. मी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतो, असं अभय भुतडा यांनी सांगितलं.

राजधानी दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देशविदेशातील मान्यवर उपस्थित आहेत. या महासोहळ्यात मुलाखत, परिसंवाद रंगले आहेत. तसेच विविध क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या मान्यवरांना नक्षत्र सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडाही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं.

शाह यांचं नेतृत्व स्वीकारतो

देशात व्यवसायासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याबरोबरच नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. कोणताही देश मजबूत कायदा सुव्यवस्थेशिवाय कधीच प्रगती करू शकत नाही. राष्ट्र आणि त्यातील नागरिकांचे संरक्षण, शांतता आणि सद्भाव कायम राखण्यासाठी साहसी पावलं उचलण्याचं काम आपले गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. मी त्यांचं मजबूत नेतृत्व स्वीकारतो आणि त्यांचं कौतुकही करतो, असं अभय भुतडा म्हणाले.

डिजीटल क्षेत्रात परिवर्तन घडवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताने डिजीटल आणि तांत्रिक सोल्यूशन काढण्यासाठी मार्केट तयार केलं. त्यामुळे मोठा डीजिटल बदल झाला आहे. सर्वसमावेशक विकासाला पुढे नेण्यासाठी मोदी यांनी डीजिटलचा वापर केला. त्यांनी याच माध्यमातून भारताला प्राद्योगिक क्षेत्राचे वैश्विक केंद्र बनवण्यासाठी प्रेरित केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तोपर्यंत आपण सक्षम होऊ

वैश्विक आर्थिक व्यासपीठावर आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारत मार्गक्रमण करत आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर भारत आहे, डीजिटल इंडियाची हाक देऊन भारताने देशात डीजिटल क्रांती घडवून आणली आहे. तसेच देशाचा विकासासाठी मानव केंद्रीत दृष्टीकोणच्या माध्यमातून डीजिटल रुपाने सशक्त समाज आणि ज्ञानाची अर्थव्यवस्थेत बदल केला आहे. अटल इनोव्हेशन मिशनने उद्योजकतेची संस्कृतीला प्रोत्साहन दिलं आहे. रोजगार सृजन आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन दिलं आहे. डीजिटलीकरण, नवोन्मेष, डीजिटलचा ढाचा निर्माण करण्यासाटी तंत्रज्ञानाच्या अनुकूलतेकडे लक्ष देण्यासह 2047पर्यंत विकसितभारताचा दृष्टीकोण विकसित करण्यास 2047पर्यंत आपण सक्षम होऊ असा मला विश्वास आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.