WITT 2024 : लातूरसारख्या छोट्या शहरातही डिजिटायजेशनने प्रचंड बदल; अभय भूतडा यांचं महत्त्वाचं विधान

देशाच्या राजधानीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट सुरू झाली आहे. देशातील या सर्वात मोठ्या महाइव्हेंटमध्ये देशातीलच नव्हे तर जगातील दिग्गज सामील झाले आहेत. यावेळी फायनान्स सेक्टरमधील कंपनी पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.

WITT 2024 : लातूरसारख्या छोट्या शहरातही डिजिटायजेशनने प्रचंड बदल; अभय भूतडा यांचं महत्त्वाचं विधान
abhay bhutada Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 8:25 PM

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : फायनान्स सेक्टरमधील कंपनी पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. मी महाराष्ट्रातील लातूरचा रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षापासून मी लातूरमधील बदल जवळून पाहत आहे. मोदी सरकारने डिजिटल युगाला सुरुवात केली. त्यामुळे छोट्या शहरातील आमच्या सारख्या अनेकांना असंख्य अडचणींवर मात करता आली आहे, असं अभय भुतडा यांनी सांगितलं. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये ते बोलत होते.

लातूरसारख्या छोट्या शहरातही बदल होत आहे. हे माझं शहर आहे. मी या शहरात अनेक बदल होताना पाहिले आहेत. देशातील डिजिटल क्रांतीने छोट्या शहरातील लोकांच्यासमोरील अनेक अडचणी संपवण्याचं काम केलं आहे. राष्ट्र निर्माणासाठी तुम्ही योगदान देत आहात हा विश्वास त्यातून निर्माण झाला आहे, असं अभय भुतडा म्हणाले.

डिजिटल सोल्यूशनचं नवं मार्केट

भारतात यावेळी डीजिटल क्रांती होत आहे. या डिजिटल क्रांतीने डिजिटल आणि टेक सोल्यूशन्ससाठी एक नवं मार्केट तयार केलं आहे. भारत सरकारची पंतप्रधान जनधन योजना, यूपीआय आणि भीम सारख्या योजनांना लोकांमध्ये सर्वसमावेशकता आणली आहे. एवढेच नव्हे तर देशात डिजिटल पेमेंटचा आधारही वाढला आहे. त्यात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे, ई-कॉमर्सचा विस्तार, लोकांमध्ये फोन वापरण्याचं प्रमाण वाढणं या प्रमुख घटना आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विश्वगुरू बनण्याचा विश्वास

डिजिटलमुळे समाजातील प्रत्येक वर्गाच्या आकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सकारात्मकरित्या मदत केली जात आहे. मी लातूरसारख्या छोट्या शहरातून येतो. या शहरात डिजिटलचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करता आली आहे. डिजिटल युगामुळे प्रत्येत व्यक्तीला राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. तसेच आपण विश्व गुरू बनू शकतो, तेवढी आपली क्षमता आहे, हा विश्वास लोकांच्या मनातही निर्माण झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कणखर, गतिशील नेतृत्व, नवविचाराचा ध्यास, उद्योजकता आणि मानवतेच्या विकासाचा ध्यास यामुळे भारत एक महासत्ता म्हणून भारताच्या स्थितीची पृष्टी करेल असा निष्कर्ष मी काढलेला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.