What India Thinks Today : राजधानीत तीन दिवस विचारांचा उत्सव, ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’त पंतप्रधानांचं खास मार्गदर्शन; असा असेल कार्यक्रम

टीव्ही9 नेटवर्कने व्हाट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. उद्या 25 फेब्रुवारी रोजी ही समीट सुरू होत आहे. दिल्लीत सुरू होत असलेली ही समीट तीन दिवस चालणार आहे. या तीन दिवसात दिल्लीत विचारांचा उत्सव रंगणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, उद्योग आणि क्रीडासह मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज या संमेलनात भाग घेणार आहे. त्यामुळे या समीटकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

What India Thinks Today : राजधानीत तीन दिवस विचारांचा उत्सव, 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'त पंतप्रधानांचं खास मार्गदर्शन; असा असेल कार्यक्रम
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 4:31 PM

नवी दिल्ली | 24 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9 नेटवर्कने राजधानी दिल्लीत मेगा इव्हेंटचं आयोजन केलं आहे. टीव्ही9 ने व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज, उद्योग जगतातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत सामील होणार आहेत. उद्या 25 फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. तीन दिवस चालणारा हा विचारांचा उत्सव 27 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मोदी देशाला उद्देशून काय भाष्य करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

टीव्ही9 नेटवर्कने उद्या 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे आणि सत्ता संमेलनाचं आयोजन केलं आहे. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता दिल्लीच्या द अशोक हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा होईल. यावेळी टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरूण दास हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुलाखत, परिसंवाद आणि पुरस्कार वितरण सोहळा असा पहिल्या दिशीचा कार्यक्रम असणार आहे.

दिवस पहिला- 25 फेब्रुवारी

दुपारी 4 वा. – टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांचं प्रास्ताविक.

दुपारी 4.15 वा. – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची मुलाखत

दुपारी 4.45 वा. – पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांचं भाषण

दुपारी 4.55 वा. – नक्षत्र सन्मान पुरस्कार सोहळा (पहिला टप्पा)

संध्याकाळी 5 वा. – क्रीडा क्षेत्रात चमकण्याची भारताला संधी, या विषयावर क्रीडा क्षेत्रातील नामवंत बोलतील.

– पुलेला गोपीचंद, नॅशनल बॅडमिंटन कोच

– लतिका खानेजा, सीईओ, कॉलेज स्पोर्ट्स ऑफ मॅनेजमेंट

– पीर नॉबर्ट, सीसीओ, बुंडेसलीगा

– मार्कस क्रेश्मर, माजी सीईओस एफके ऑस्ट्रिया व्हिएन्ना

– शुभ्रांशु सिंह, सीएमओ, सीव्हीबीयू टाटा मोटर्स

– लॉयड मॅथियास, उद्योग रणनीतीकारण आणि मार्केटिंग व्हेटिरियन

सायंकाळी 5.45 वा.- नक्षत्र सन्मान पुरस्कार सोहळा (दुसरा टप्पा)

सायंकाळी 5. 55 वा.- ब्रँड इंडिया: सॉफ्ट पावरचा फायदा या विषयावर जी 20चे शेरपा अमिताभ कांत बोलतील

संध्या. 6.25 वा.- नक्षत्र संमेलन (तिसऱ्या टप्प्यातील पुरस्कार)

संध्या. 6.35 वा. – FIRESIDE CHAT- महिला नायिका – नवी नायिका या विषयावर प्रसिद्ध अभिनेत्री, पद्मश्री रवीना टंडन बोलतील

संध्या. 7 वा. – महिला नायिका – नवी नायिका या विषयावर संवाद

– खुशबू सुंदर, महिला आयोगाच्या सदस्या

– मिरजम ईसेले, संचालिका, स्टिफ्टंग जुगेंडौस्टौश बायर्न

– जुलिया फर, फुटबॉल प्रचारक, बोरुसिया डॉर्टमुंड

– आयेशा गुप्ता, संचालिका एचआर, गेल

संध्या. 7.45 वा.- नक्षत्र सन्मान पुरस्कार ( चौथा टप्पा)

संध्या. 7.55 वा.- असीम भारत: बॉलिवूडच्या पलीकडे

– शेखर कपूर, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते

– ख्रिस्तोफर रिप्ले, सीईओ, सिंक्लेअर ब्रॉडकास्ट ग्रुप

– रिकी केज, संगीतकार, मानवतावादी आणि पर्यावरणवादी

– व्ही सेल्वागणेश, 2023 ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय तालवादक

दिवस दुसरा- 26 फेब्रुवारी

सकाळी 9 वा.- टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचं स्वागतपर भाषण

सकाळी 9.10 वा.- आशिया-पॅसिफिक ते इंडो-पॅसिफिक: प्रादेशिक संबंध सुधारणे या विषयावर ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट हे बोलणार आहेत.

सकाळी 9.45 वा.- विषय – युद्धाचे युग नाही : वैश्विक शांती उत्प्रेरक म्हणून भारताचा उदय

– वेलिना चाकारोवा, भूराजनीतिक रणनीतिकार आणि संस्थापक, FACE

– मारिया अहमद दीदी, मालदीव गणराज्याची माजी संरक्षण मंत्री

– सैयद अकबरुद्दीन, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधि

सका. 10.25 वा.- AI: वचन आणि संकटे

– अशोक शुक्ला, संचालक AI व्हिजन, सॅमसंग रिसर्च

– प्रा.अनुराग मायरा, स्टॅनफोर्ड प्रो. बायोटेक, AI मध्ये स्पेशलायझिंग

– शैलेश कुमार, चीफ डेटा सायंटिस्ट, सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय/एमएल, रिलायन्स जिओ

– समिक रॉय, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट, मध्यम आणि लघु व्यवसाय, मायक्रोसॉफ्ट इंडिया

– जोनाथन ब्रॉन्फमन, उद्योजक आणि चित्रपट निर्माता, सह-अध्यक्ष मार्झ

सका. 11 वा. – नारी शक्ती: ड्रायव्हिंग मिशन ‘विकसित’ भारत या विषयावर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या संवाद साधतील

सका. 11.30 वा.- विषय- स्टार्टअप, भारत: स्केल अप आणि सस्टेन

– सुषमा कौशिक, संस्थापक भागीदार, 108 कॅपिटल

– ग़ज़ल अलघ, सह-संस्थापक, मामाअर्थ

– अखिल गुप्ता, सह-संस्थापक आणि CTO, नोब्रोकर

– जयेन मेहता, एमडी, अमूल

दुपारी 12:10 वा.- FIRESIDE CHAT- नव्या भारतासाठी सिनेमा या विषयावर अभिनेते आयुष्मान खुराना बोलणार आहेत.

दुपारी 12.35 वा. – फिनटेक 3.0 : आव्हाने आणि संधी या विषयावर भारतपेचे चेअरमन आणि एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार यांची मुलाखत होणार आहे.

दुपारी 1.35 वा.- इन्फ्रा, गुंतवणूक आणि IT: भारताची 3I अनिवार्यता या विषयावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

दुपारी 2.05 वा.- विषय : एका न्यायसंगत बोर्ड रुमची गरज

– मनेका गुरुस्वामी, वरिष्ठ वकील, सर्वोच्च न्यायालय

– विनीता सिंह, सहसंस्थापक आणि सीईओ शुगर कॉस्मेटिक

– पल्लवी श्रॉफ, शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार

– रितुपर्णा चक्रवर्ती, टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेडच्या सह-संस्थापक

– डॉ. श्रीनाथ श्रीधरन, पॉलिसी रिसर्चर आणि कॉर्पोरेट सल्लागार

दुपारी 2.45 वा.- विषय : सेटिंग द रेकॉर्ड स्ट्रेट

– साल्वाटोर बेबोन्स, समाजशास्त्रज्ञ आणि लेखक, सिडनी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक

– विक्रम संपत, इतिहासकार आणि लेखक

– सलमान खुर्शीद, भारताचे माजी परराष्ट्र मंत्री

– मिली अश्वर्या, वरिष्ठ प्रकाशक, पेंग्विन रँडम हाऊस इंडिया

दुपारी 3.30 वा.- FIRESIDE CHAT | चार्टिंग द ग्रोथ ट्रॅजेक्टरी फॉर इंडियाज एफएमसीजी इंडस्ट्री या विषयावर झायडूस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा हे संवाद साधणार आहेत.

दुपारी 3.45 वा. – FIRESIDE CHAT | सस्टेनिंग द मोमेंट अँड मोमेंटम या विषयावर मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव हे बोलतील.

दुपारी 4. 15 वा. – FIRESIDE CHAT | कॅब्रिटिंग द कन्स्मप्शन कोनंड्रम या विषयावर महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ आणि एमडी डॉ. अनिश शाह बोलणार आहेत.

दुपारी 4.40 वा.- FIRESIDE CHAT | क्रिएटीव्ह : वर्ल्ड इज माय ऑयस्टर या विषयावर अभिनेत्री कंगना राणावत बोलणार आहे.

संध्या. 5:10 वा. – विषय – बेटिंग ऑन इंडिया : द मायक्रो व्ह्यू

– जोडी मॅके, ऑस्ट्रेलिया-इंडिया बिझनेस कौन्सिलचे संचालक आणि माजी विरोधी पक्षनेता, ऑस्ट्रेलिया सरकार

– मुकेश अघी, अध्यक्ष आणि सीईओ, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम

– निलेश शहा, कोटक म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक

– अँड्र्यू हॉलंड, सीईओ, अव्हेंड्स कॅपिटल अल्टरनेट स्ट्रॅटेजीज

– डॉ. संजीव सन्याल, सदस्य, पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद (EAC-PM)

संध्या. 5.50 वा. – FIRESIDE CHAT : टेलविंड्स फॉर इंडिया या विषयावर जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी डॉ. विवेक लाल हे संवाद साधतील.

संध्या. 6:20 वा. – द राईज ऑफ द ग्लोबल साऊथ या विषयावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची मुलाखत होणार आहे.

रात्री 8 वा. – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य भाषण

दिवस तिसरा – 27 फेब्रुवारी

सका. 9 वा.- टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांचं स्वागतपर भाषण

सका. 10. वा.- नव्या भारताची शौर्य गाथा या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मार्गदर्शन होईल

सका. 10.45 वा.- 2024मध्ये सत्ता कुणाची? या विषयावर एआयसीसीच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेडा हे भाष्य करणार आहेत.

सकाळी 11.25 वा. – ग्लोबल स्वामी या विषयावर योग गुरू बाबा रामदेव हे बोलणार आहेत.

दुपारी 12 वा.- काश्मीरची नवी कहाणी या विषयावर जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा बोलतील.

दुपारी 12.25 वा.- एक देश, एक विधान नवा हिंदुस्थान या विषयावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे संवाद साधणार आहेत.

दुपारी 12.50 वा.- नव्या भारताची गॅरंटी या विषयावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई बोलणार आहेत.

दुपारी 1.20 वा. – नव्या भारताची गॅरंटी या विषयावर हरयाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर बोलतील

दुपारी 1.40 वा. – शेतकऱ्यांची कोंडी कशी फुटेल? या विषयावर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे बोलणार आहेत.

दुपारी 3 वा. – आप का ‘मान’ या विषयावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान संवाद साधणार आहेत.

दुपारी 3.45 वा. – मोदी है तो गॅरंटी है या विषयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मार्गदर्शन होणार आहे.

संध्या. 4.15 वा.- ऑल इंडिया भाईजान या विषयावर एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी बोलतील.

संध्या 5.5 वा.- अब की बार 400 पार? या विषयावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव संवाद साधणार आहेत.

संध्या. 5.30 वा.- हिंदुओं का हिंदुस्थान या विषयावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाष्य करणार आहेत.

संध्या. 6.20 वा. – तिसरी बार मोदी सरकार? या विषयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे बोलणार आहेत.

संध्या. 7 वा.- इंडिया में सब बंटे हुए है जी? या विषयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संवाद साधतील.

संध्या. 7. 55 वा. – इंडिया का अर्जुन या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलतील.

रात्री 9 वा. – नेपथ्य का नायक या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं समारोपाचं मार्गदर्शन होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.