What India Thinks Today : देशातील सर्वात मोठ्या मेगा इव्हेंटला सुरुवात; दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हचं थाटात उद्घाटन
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हची सुरुवात झाली आहे. आजपासून तीन दिवस दिल्लीच्याअशोका हॉटेलमध्ये ही कॉन्क्लेव्ह पार पडत आहे. सलग तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी विविध सत्र होणार आहेत.
नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हची सुरुवात झाली आहे. आजपासून तीन दिवस दिल्लीच्याअशोका हॉटेलमध्ये ही कॉन्क्लेव्ह पार पडत आहे. या कॉन्क्लेव्हला देश विदेशातील मान्यवर उपस्थित आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचं आज शानदार उद्घाटन करण्यात आलं. यावेळी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी प्रास्ताविक केलं.
सलग तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी विविध सत्र होणार आहेत. त्यात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा हे संबोधित करणार आहेत. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील भारताच्या संधींवर परिसंवाद होणार असून त्यात दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मनोरंजन क्षेत्रासह इतर क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
आजचे कार्यक्रम-
दुपारी 4.15 वा. – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची मुलाखत
दुपारी 4.45 वा. – पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांचं भाषण
दुपारी 4.55 वा. – नक्षत्र सन्मान पुरस्कार सोहळा (पहिला टप्पा)
संध्याकाळी 5 वा. – क्रीडा क्षेत्रात चमकण्याची भारताला संधी, या विषयावर क्रीडा क्षेत्रातील नामवंत बोलतील.
– पुलेला गोपीचंद, नॅशनल बॅडमिंटन कोच
– लतिका खानेजा, सीईओ, कॉलेज स्पोर्ट्स ऑफ मॅनेजमेंट
– पीर नॉबर्ट, सीसीओ, बुंडेसलीगा
– मार्कस क्रेश्मर, माजी सीईओस एफके ऑस्ट्रिया व्हिएन्ना
– शुभ्रांशु सिंह, सीएमओ, सीव्हीबीयू टाटा मोटर्स
– लॉयड मॅथियास, उद्योग रणनीतीकारण आणि मार्केटिंग व्हेटिरियन
सायंकाळी 5.45 वा.- नक्षत्र सन्मान पुरस्कार सोहळा (दुसरा टप्पा)
सायंकाळी 5. 55 वा.- ब्रँड इंडिया: सॉफ्ट पावरचा फायदा या विषयावर जी 20चे शेरपा अमिताभ कांत बोलतील
संध्या. 6.25 वा.- नक्षत्र संमेलन (तिसऱ्या टप्प्यातील पुरस्कार)
संध्या. 6.35 वा. – FIRESIDE CHAT- महिला नायिका – नवी नायिका या विषयावर प्रसिद्ध अभिनेत्री, पद्मश्री रवीना टंडन बोलतील
संध्या. 7 वा. – महिला नायिका – नवी नायिका या विषयावर संवाद
– खुशबू सुंदर, महिला आयोगाच्या सदस्या
– मिरजम ईसेले, संचालिका, स्टिफ्टंग जुगेंडौस्टौश बायर्न
– जुलिया फर, फुटबॉल प्रचारक, बोरुसिया डॉर्टमुंड
– आयेशा गुप्ता, संचालिका एचआर, गेल
संध्या. 7.45 वा.- नक्षत्र सन्मान पुरस्कार ( चौथा टप्पा)
संध्या. 7.55 वा.- असीम भारत: बॉलिवूडच्या पलीकडे
– शेखर कपूर, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते
– ख्रिस्तोफर रिप्ले, सीईओ, सिंक्लेअर ब्रॉडकास्ट ग्रुप
– रिकी केज, संगीतकार, मानवतावादी आणि पर्यावरणवादी
– व्ही सेल्वागणेश, 2023 ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय तालवादक