What India Thinks Today : ‘अग्निपथ योजने’च्या विरोधाबाबत रविशंकर म्हणाले – ट्रेन जाळून उपयोग नाही, तरुणांनी नवीन संधीचा स्वीकार करावा

माजी केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘अग्निपथ योजने’ला तरुणांकडून होत असलेल्या विरोधाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, तरुणांनी योजनेबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, उगाच विरोध करण्यापेक्षा या योजनेकडे नवीन संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.

What India Thinks Today : ‘अग्निपथ योजने’च्या विरोधाबाबत रविशंकर म्हणाले - ट्रेन जाळून उपयोग नाही, तरुणांनी नवीन संधीचा स्वीकार करावा
टीव्ही 9 ग्लोबल समिटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:38 PM

भारतातील नंबर एक न्यूज नेटवर्क TV9 तर्फे आयोजित ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट’ (What India Thinks Today Global Summit) च्या पहिल्या सत्रात, माजी केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘अग्निपथ योजने’वर आपले विचार मांडले. प्रसाद यांनी सर्वप्रथम तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले. रेल्वेची संपत्ती ही देशाची संपत्ती असल्याने अशा प्रकारे रेल्वेला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तुम्ही लोकही या ट्रेनमधूनच प्रवास करता, त्यामुळे ती जाळण्यात काही फायदा नाही. तरुणांचे म्हणणे ऐकूनच अग्निपथ योजना (Agneepath Yojana) आणण्याचे काम सरकारने केले आहे. कोरोनामुळे तरुणांना संधी मिळू शकत नसल्याची तक्रार समोर आल्यानंतर, सरकारने वयोमर्यादेतही दोन वर्षांची वाढ केली. तरुणांसाठी ही एक नवीन संधी (A new opportunity) असून, त्याला विरोध न करता तरुणांनी या संधीचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘इंडिया फर्स्ट’शी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी भारत म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. भारत हा फक्त भूगोल नसून, त्यापेक्षा ते कितीतरी पटीने जास्त आहे, असा आमचा पक्ष मानतो. आज जगभर भारताचा आवाज ऐकू येतो. मग ते कोरोनाचे असो किंवा रशिया-युक्रेनचे युद्ध असो. हे शक्य झाले कारण भारत हा लोकशाही देश आहे. हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आता भारताकडे आहे. बालाकोट असो वा उरी, अशा स्थितीत भारताचा प्रथम विचार करता येईल.

रविशंकर प्रसाद म्हणाले, आम्हाला या देशातील मुस्लिमांची कमी मते मिळतात. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. देशात जनधन योजना सुरू झाली, तेव्हा त्याचा लाभ मुस्लिम जनतेला दिला गेला नाही का? जेव्हा प्रत्येक गावात वीज पुरवठा करण्यात आला, तेव्हा मुस्लिम गावेही त्यात समाविष्ट होती. देशाला एकसंघ करणारे सरदार पटेल यांचे 1950 मध्ये निधन झाले. परंतु, त्यांना भारतरत्न देण्यास 1991 साली उजाडले. याची आम्हाला खंत वाटते. त्याचप्रमाणे महान भारतीय मौलाना आझाद यांचे 1958 मध्ये निधन झाले आणि त्यांना 1991 मध्ये भारतरत्न मिळाले.

हे सुद्धा वाचा

अग्निपथ योजना तरुणांसमोर नवी संधी

अग्निपथ योजनेवर बोलताना भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, तरुणांनी ही महत्त्वाकांक्षी योजना नीट समजून घेण्याची गरज आहे. तरुणांनी अशांतता निर्माण करू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन करून ते म्हणाले की, रेल्वे मालमत्तेचे नुकसान करून काहीही मिळणार नाही. अग्निपथ योजना तरुणांसमोर एक नवीन संधी बनत आहे, तरुणांनी आधी त्याची चाचणी घेऊन मग मत व्यक्त करणे योग्य होईल.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.